Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये १६ डिसेंबर सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर कामकाज स्थगित झालं. पण आज दुसऱ्या दिवशी कामकाजाची सुरुवातच बीड व परभणीतील प्रकरणांच्या वादळी चर्चांनी झाली. दुपारच्या सुमारास राज्यपालांच्या अभिभाषणावर सदस्यांच्या भाषणांना सुरुवात झाली. आपल्या भाषणात शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या उल्लेखांमुळे सभागृहाचं वातावरण भलतंच तापलं. वाद एवढा वाढला की भर विधानसभेत भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भास्कर जाधवांना “वैचारिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करी नका”, असं म्हटल्यामुळे यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

विधानसभेत नेमकं घडलं काय?

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भास्कर जाधव यांनी भाषणाला सुरुवात करताच राज्यपालांची परवानगी न घेताच सत्ताधाऱ्यांनी शपथविधीचा दिवस, वेळ आणि ठिकाण निश्चित करून टाकल्याचा दावा केला. “या सरकारनं ५ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता शपथ घेतली. निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या पक्षाला सरकार बनवायचं असेल तर आधी राज्यपालांनी बहुमत असणाऱ्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं. त्यांनी निमंत्रित केलं नाही तर सरकार बनवू इच्छितो त्या पक्षानं समर्थन देणाऱ्या पक्षांची यादी घेऊन राज्यपालांकडे जावं लागतं. ते गेले नाहीत तर राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का? त्यासाठी राज्यपालांनी शपथविधीची तारीख जाहीर करायची असते. ते राज्यपालांनी सांगायचं असतं. शपथविधीची जागा बदलायची असेल तरीदेखील राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते”, असं भास्कर जाधव म्हणाले.

bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
union minister of state for health prataprao jadhav grab state blood transfusion council office
आरोग्य राज्यमंत्र्यांसाठी ‘एसबीटीसी’चेच संक्रमण
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis in buldhana
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू

“राज्यपालांनी तुम्हाला सरकार स्थापनेसाठी कधी बोलवलं? राज्यपालांकडे पाठिंब्याची यादी कधी घेऊन गेलात? हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षांनी त्यांच्या गटनेत्यांची निवड केली. पण देवेंद्र फडणवीसांची निवड ४ डिसेंबरला झाली. त्यानंतर ४ तारखेला तीन पक्षांचे तीन नेते राज्यपालांकडे गेले की आपल्याला शपथ घ्यायची आहे. पण आझाद मैदानात शपथविधीच्या मंडपाचं काम कधी सुरू झालं? कुणी केलं? कुणी ठरवलं? राज्यपालांनी ठरवलं की आणखी कुणी ठरवलं? २२ मुख्यमंत्री शपथविधीला येणार आहेत असं सांगितलं. देशाचे पंतप्रधान येणार हेही सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री, इतर मंत्री येणार असंही जाहीर झालं. त्यांचे दौरेही नक्की झाले. तरीही राज्यपालांकडून त्यासंदर्भातली कोणतीही अधिसूचना निघाली नाही. राज्यपालांना असं गृहीत धरलं गेलं”, असंही भास्कर जाधवांनी नमूद केलं.

विखे पाटलांचा आक्षेप

दरम्यान, भास्कर जाधवांच्या उल्लेखावर विखे-पाटील यांनी आक्षेप घेतला. “विरोधी पक्षांचा आक्षेप काय आहे हे कळत नाही. ही मंडळी इतकी वैफल्यग्रस्त झालीये की अध्यक्षांचाही अवमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वारंवार अध्यक्षांवर आक्षेप घेण्याचं काम चालू आहे. भास्कर जाधव यांनी सभागृहाची गरीमा कायम ठेवावी. त्यांनी राज्यपालांबाबतच्या विधानाबाबत माफी मागायला हवी”, असं त्यांनी म्हणताच पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी हल्लाबोल केला.

“राधाकृष्ण विखे पाटीलजी.. तुम्ही कान साफ करा. तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यानं असं बोलू नये. राज्यपालांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा मुद्दा मांडला. मुळात एवढं बहुमत असताना विरोधी पक्षाची मतं ऐकून घेण्याची लेव्हल सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीये. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यानं वारंवार उभं राहणारं शोभणारं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.

Uddhav Thackeary meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; विधीमंडळात १० ते १५ मिनिटांच्या चर्चेत काय घडले?

“बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करू नये”

यावर विखे पाटील यांनी भास्कर जाधव यांच्यावर खोचक टिप्पणी केली. “भास्कर जाधवांनीही सभागृहाची गरीमा जपली पाहिजे. आम्हाला एवढा जनाधिकार मिळालाय भास्कर जाधवांनी स्वीकारावं. एवढं वैफल्यग्रस्त होऊ नका. जनतेचा निर्णय मान्य करा. माझी एवढीच सूचना आहे की भास्कर जाधवांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन दाखवू नये. आपण चांगलं काम करा. राज्यपालांच्या भाषणाबाबत बोला. त्यांचे आक्षेपार्ह शब्द आहेत. ते आम्हाला मान्य नाही”, असं ते म्हणाले.

Story img Loader