माजी मंत्री शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंबरोबर शिवसेना खासदर अनिल देसाई, खासदार प्रियंका चर्तुवेदी हे सुद्घा उपस्थित होते. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पहिल्यांदाच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे एकत्र आल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. दरम्यान, या भेटीवरून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “महाराष्ट्र संभाळता आला नाही आणि बिहारला चालले आहेत. पहिल्यांदा आपलं घर संभाळात आले नाही, आणि आमच्यावर गद्दारीचे आरोप करण्यात करता. खरे गद्दार तुम्ही आहात,” अशी टीका भावना गवळी यांनी केली आहे.

हेही वाचा : “…तर माझा जीवही गेला असता”, ‘गद्दार, गद्दार’ घोषणेनंतर भावना गवळींचा आरोप; राऊत, देशमुखांच्या अटकेची मागणी

“आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्यामुळे खरे गद्दार कोण आहे, हे सर्वांना दिसलं आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार विकले नाही. आम्ही खरी शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन निघाले आहोत. म्हणून यांच्या पोटात दुखत आहे,” असेही भावना गवळी यांनी म्हणाल्या. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा : “प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा करण्यास तयार”, अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

“लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची…”

दरम्यान, भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, “ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती. ही राजकीय भेट नाही, प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे. पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavana gawali on aaditya thackeray bihar tour meet tejawsi yadav ssa
Show comments