धाराशिव : केळीच्या बुंद्याला पेटवलेला आगीचा लोळ, आई राजा उदो-उदोच्या गगनभेदी घोषणा, संबळाचा कडकडाट, अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काळभैरवनाथाने कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. वर्षातून एकदा दिवाळीच्या काळात होणार्‍या या चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी देवी मंदिराचा गाभारा उजळून निघाला होता. यावेळी भाविकांचीही मोठी गर्दी होती.

दिवाळीत नरकचतुदर्शीच्या दिवशी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात गुरूवारी काळभैरव भेंडोळी उत्सव साजरा करण्यात आला. आगीचा लोळ घेऊन तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये पेटवलेली भेंडोळी फिरविण्यात आली. हा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक तुळजाभवानी मंदिरामध्ये येतात.संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेचा दरबारात अश्विन अमावस्येच्या संध्याकाळी धगधगत्या अग्नीचा थरार रंगला होता. आई राजा उदो-उदो आणि ‘काळभैरवनाथाचा चांगभलंऽऽ’च्या जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगाखांद्यावर वाहून नेण्याचा थरार सुमारे दीड तास सुरू होता. हा अग्नीचा थरार पाहण्यासाठी भेंडोळी मार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी भेंडोळीवर तेल, तुप, पाणी वाहिले.

raj thackerat latest news
राज ठाकरेंना आईच्या हातचं जेवण आवडतं की पत्नीच्या हातचं? शर्मिला ठाकरे पुढच्याच क्षणी म्हणाल्या अर्थात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ARvind sawant and Shaina nc
Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”

हेही वाचा >>> Arvind Sawant : “शायना एन. सी. माझी जुनी मैत्रीण…”, ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण!

तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेला वसलेल्या काळभैरवनाथाचा कड्यावर गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास काळभैरवनाथाचे पुजारी शुभम पुजारी, गणेश पुजारी, वैजीनाथ पुजारी, तानाजी पुजारी, सुनिल पुजारी, प्रकाशनाथ पुजारी, सोमनाथ पुजारी आदींनी भेंडोळी प्रज्वलित केली. यावेळी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, मंदिर संस्थानचे कर्मचारी, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पूर्वी गुरुवारी दिवसभर अमावस्येनिमित्त काळभैरवनाथाला तेलाचे अभिषेक घालण्यासाठी शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी कड्यावर मोठी गर्दी केली होती. तर भेंडोळी मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. भेंडोळीसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा >>> महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”

देशात दोन ठिकाणीच भेंडोळी उत्सव देवांचे रक्षण करणारा रखवालदार म्हणजे काळभैरवनाथ. म्हणजे या परिसराचा कोतवाल. तो वर्षांतून एकदा अश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करण्यासाठी निघतो. त्यांचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आयोजित करण्याची परंपरा आहे. तसेच काळभैरनाथाला काशीचा कोतवालही म्हटले जाते. त्याचे ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच साजरा होतो.

Story img Loader