‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पध्रेच्या महाअंतिम फेरीत रत्नागिरी विभागातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘भोग’ या एकांकिकेने धडक मारली आहे. सांघिक विजेतेपदाबरोबरच लेखन वगळता सर्व वैयक्तिक पुरस्कारांवरही ‘भोग’च्या कलाकारांनी आपले नाव कोरले. या केंद्राच्या विभागीय अंतिम फेरीत नवनिर्माण महाविद्यालयाच्या ‘गिमिक’ आणि डीबीजे महाविद्यालयाच्या ‘अपूर्णाक’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

या फेरीतील विजेत्या एकांकिकेच्या संघाला १७ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या राज्य पातळीवरील महाअंतिम फेरीत कला सादर करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.

Story img Loader