भोकरदन येथे पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांना अटक केली. भोकरदन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडताना तेथे पोहोचलेल्या गस्तीवरील पोलिसांवर गोळीबाराचा प्रकार अलीकडेच घडला होता. श्रीकांत चद्रकांत हांडगे (३३) व साजिद जाकीर हुसेन (३६) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यांना बुलडाणा जिल्हय़ातील चिखली येथे अटक केली.

Story img Loader