आईच्या वर्षश्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे ५०० रुपये उधारी शिल्लक होती. ही उधारी देण्यासाठी मोठा भाऊ आणि छोट्या भावामध्ये वाद झाला. या वादातून मोठ्या भावाने छोट्या भावाला दगड, सळईने मारहाण केली. यात पीडित लहान भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील पिंजारवाडीत घडली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. सैफन घूडूसाब नदाफ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी मीरालाल घुडूसाब नदाफ, सलीम मीरालाल नदाफ, रफिक मीरालाल नदाफ, नियामतबी मीरालाल नदाफ यांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईचे श्राद्ध करण्यासाठी केलेल्या खर्चावरून केवळ पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने छोट्या भावाची हत्या केल्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. एक वर्षापूर्वी मीरालाल आणि सैफन यांच्या आईचे निधन झाले होते. या दोघा भावांनी एकत्रितरित्या आईचे श्राद्ध करून गोरगरिबांना अन्नदान केले होते. यावेळी गावातील एका मशिदीत असलेल्या मंगल भांडारमधून भाड्याने भांडी घेतली होती. या मंगल भांडारचे ५०० रुपये उधारी शिल्लक राहिली होती. ही उधारी मागण्यासाठी मशिदीचे विश्वस्त जमादार सैफन नदाफ यांच्या घरी गेले होते. यावेळी सैफन नदाफने ही रक्कम मीरालाल नदाफकडून घ्या असे सांगितले.

सैफन नदाफ यांनी मंगल भांडारवाल्या जमादारांना सांगितले होते की, ५०० रुपये मीरालाल नदाफ यांच्याकडून घ्या. त्यांनी नाही दिले, तर मी देतो. मीरालाल नदाफ यांनी मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी दिली, पण यावरून दोघा भावांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आणि वाद झाला. मीरालाल नदाफ यांनी पाचशे रुपये उधारी देऊन जमादार यांना पाठविले, पण ५०० रुपयांवरून मीरालाल नदाफ छोटा भाऊ सैफन नदाफवर चिडून होता.

सैफन नदाफ हा शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी सैफन हा एकटा असल्याची संधी साधून मीरालाल नदाफ यांनी ५०० रुपयांसाठी कर्जदारांना माझ्या घरी पाठवतो का असा जाब विचारत सैफनला मारहाण केली. यावेळी मीरालाल यांचा मुलगा रफिक नदाफ याने पाठीमागून येऊन सैफन नदाफ यांचे हातपाय पकडले, मीरालाल नदाफ यांनी दगडाने, सळईने छोटा भाऊ सैफन नदाफ याच्या डोक्यावर वार केले. मीरालाल नदाफ यांची पत्नी नियामतबी नदाफ, दुसरा मुलगा सलीम नदाफ यांनीही पीडित सैफन नदाफच्या डोक्यावर आणि सर्वांगावर जबर मारहाण केली.

हेही वाचा : दाखल गुन्ह्यांमध्ये नागपूर सहाव्या स्थानावर ;  देशात महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे – एनसीआरबीचा अहवाल

दरम्यान, सैफन नदाफ यांना त्यांची पत्नी शहनाज नदाफ यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने सैफन यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि सैफन यांची प्राणज्योत मालवली. सैफन मृत झाल्याची माहिती मिळताच पिंजारवाडीतील ग्रामस्थांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती. फक्त पाचशे रुपयांसाठी भावानेच भावाची हत्या केल्याने सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत वळसंग पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि पिंजारवाडी उपसरपंच घनीबाबुलाल शेख यांनी माहिती दिली.