काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या खातेवाटप आणि मंत्रीमंडळावर बोलताना जोरदार शाब्दिक हल्ला केला. तसेच शिंद गटाने कितीही विरोध केला, तरी अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच मिळेल, असा मोठा दावा केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला. तसेच शिंदे गटाचा स्वाभिमान काढत थेट आव्हान दिलं. ते गुरुवारी (१३ जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “शिंदे गटाकडून अजित पवारांना अर्थखात देण्याला विरोध होत आहे. कारण ते आधी जाहिरपणे म्हणाले होते की, अजित पवार त्यांना निधी देत नाहीत. अजित पवारांमुळे आम्हाला शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं. आता अजित पवारांना जाहिरपणे सांगा की, आम्ही राहू शकत नाही. शिंदे गटात थोडासा जरी स्वाभिमान असेल, त्यांच्या शब्दाला काही किंमत असेल, तर त्यांनी हे बोलून सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे.”

“अर्थखातं अजित पवारांनाच मिळेल. कारण देवेंद्र फडणवीसांनी…”

“अर्थखातं अजित पवारांनाच मिळेल. कारण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अर्थखातं देण्याचं आश्वासन दिलं आहे. आता फडणवीस शिंदे गटाची समजूत काढतील. आम्ही लक्ष घालू, आमचं लक्ष राहील, मागच्याप्रमाणे आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असं फडणवीस सांगितली. मात्र, ते अजित पवार आहेत. ते कुणालाही ऐकणार नाहीत,” असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला.

“हे सगळे प्रकार होणार आहेत. यातून यांचं जे व्हायचं ते होईल, मात्र, महाराष्ट्रातील जनतेचं प्रचंड नुकसान होणार आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.

“देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही ‘टेरर’ नेते आहेत”

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही ‘टेरर’ नेते आहेत. त्यामुळे दोन्ही ‘टेरर’ नेते एका ठिकाणी कसे राहू शकतील. मागच्यावेळीही याचा उल्लेख केला होता. आता नेमकी काय अपरिहार्यता आहे हे कळलं नाही की वरिष्ठांचा आदेश आहे की इतर कशामुळे हे झालंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. हे सरकारविकासासाठी स्थापन झालेलं नाही. हे सरकार ईडीमुळे आलं आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे. हे लपून राहू शकत नाही.”

हेही वाचा : “जितेंद्र आव्हाडांमुळे पक्षाचं नुकसान झालं”, अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “भाजपाबरोबर…”

“स्वतः निर्णय घेणारे आज दुसऱ्यांवर अवलंबून राहत आहेत”

“आमच्या एका नेत्याने सांगितलं तसं हे काल राजे होते, आज सुभेदार व्हायला निघाले आहेत. एका छोट्या राज्याचे राजे असणारे, स्वतः निर्णय घेणारे आज दुसऱ्यांवर अवलंबून राहत आहेत. यावरून त्यांची जनतेतील प्रतिमा उंचावत आहे की खालावत आहे हे जनता ठरवेल,” असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलं.