Vande Bharat Train : वंदे भारत या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. शिर्डी आणि सोलापूर या दोन्ही शहरांमध्ये जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन्सबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी या दोन्ही ट्रेन्सना आणखी एक एक थांबा देण्यात येणार आहे. रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.

काय आहे हा निर्णय?

सोलापूरला जाणारी वंदेभारत ट्रेन ही आधी ठाण्याला थांबत नव्हती कल्याणला तिला थांबा दिला होता. मात्र आता ही ट्रेन ठाण्यालाही थांबणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शिर्डीला जाणारी वंदे भारत ट्रेन ही कल्याणला थांबत नव्हती मात्र आता ही वंदे भारत ट्रेन कल्याणला थांबणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांसाठी ही आनंदाचीच बातमी ठरली आहे. उद्यापासून म्हणजेच ४ ऑगस्टपासूनच या ट्रेन्स या कल्याणला थांबणार आहेत. मध्य रेल्वेने ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे.

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

दोन्ही वंदे भारत ट्रेन्स कल्याणला थांबणार

या निर्णयामुळे सोलापूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स या कल्याणला थांबणार आहेत. वंदे भारत ट्रेनमुळे वेळेची बचत होते त्यामुळे या ट्रेनचं तिकिट जास्त असलं तरीही या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोलापूरला जाणारी वंदेभारत ट्रेन ही अवघ्या तीन तासात मुंबईहून पुण्यात पोहचते. मुंबई ते शिर्डी हे अंतर सहा तासांमध्ये कापलं जातं. १० फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाराष्ट्रात दोन वंदे भारत ट्रेन्स सुरु झाल्या होत्या. पहिली ट्रेन मुंबई ते सोलापूर अशी तर दुसरी ट्रेन ही मुंबई ते साईनगर शिर्डी अशी आहे.