गेल्या वीस दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाची २० धरणे तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आठ लुघपाटबंधारे प्रकल्प आणि ३९ पाझर तलाव पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. उर्वरीत पाझर तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रायगड जिल्ह्यात सरासरी ३ हजार १४२ मिलीमीटर पाऊस पडत असतो. या तुलनेत २० जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी १६७८ मिलीमिटर पावसांची नोंद झाली आहे. जून महिन्यात अनियमित पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ६४३ मिलीमिटर पाऊस पडतो. या तुलनेत यावर्षी ३५७ मिलीमिटर पाऊस झाला होता. तर जुलै महिन्यात १ हजार ०१८ मिलिमिटर येवढे पावसाचे पर्जन्यमान असते.

तुलनेत यंदा २० जुलै पर्यंत १ हजार ३२१ मिलीमीटर पावसांची नोंद झाली आहे. म्हणजेच जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत २० दिवसात ११३ टक्के पाऊस पडला आहे. दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

जिल्हा परिषदेची ९० टक्के धरणे आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेनी भरले –

जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे आहेत. यातील २० धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहेत. तर कुडकी हा लुघपांटबंधारे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. रानवली, कार्ले, सळोख, अवसरे, श्रीगाव, मोरबे आणि पुनाडे ही धरणे अद्याप भरलेली नाहीत तर जिल्हा परिषदेची ९० टक्के धरणे आणि पाझर तलाव पुर्ण क्षमतेनी भरले आहेत.

९ लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प पूर्ण क्षमेतेने भरले –

जिल्हा परिषद्च्या अखत्यारीत असलेल्या ९ लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प पूर्ण क्षमेतेने भरले आहेत. कर्जत तालुक्याती पाथरज प्रकल्पातही ७५ टक्के पाणी साठा जमा झाला असून येत्या काही दिवसात तोही भरण्याची शक्यता आहे. तर ४५ पाझर तलावांपैकी १९ पाझर तलावर पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. वडाची वाडी, पहूर, पाखरशेत, कुडली १, सरफळेवाडी हे पाझर तलाव येत्या दोन ते तीन दिवसात भरण्याची शक्यता आहे. त्यांच्यात ९५ टक्केहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तर कर्जत मधील आर्ढे हे पाझर तलाव ५० टक्के पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील बहूतांश धरणे पूर्ण क्षमतेनी भरल्याने रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big relief for raigadkar zilla parishad dams and seepage ponds were filled msr