राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी भारताबाबत मोठं विधान केलं आहे. “पूर्वी आम्ही बाहेर देशात जायचो, तेव्हा कुठेही गेल्यावर भारताचं नाव सांगितल्यावर लोक हे उधारीवाले लोक आहेत असं म्हणायचे,” असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. ते रविवारी (२५ जून) ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपा-शिंदे गटाचे आमदार, खासदारही उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरीश महाजन म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारतात आले होते. ते एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांनी पायाला हात लावून नमस्कार केला. मित्रांनो ही छोटी गोष्ट नाही. पूर्वीचा देश आठवा. त्यावेळी आम्ही बाहेर देशात जायचो, तेव्हा कुठेही गेल्यावर देशाचं नाव भारत सांगितल्यावर लोक बारीक डोळे करायचे. हे उधारीवाले लोक आहेत म्हणायचे. हे मागणारेच लोक आहेत असं म्हणायचे.”

हेही वाचा : VIDEO: “देवेंद्र फडणवीसांनी या माजी मुख्यमंत्र्यांना अनेकदा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

व्हिडीओ पाहा :

“आधी पाकिस्तान डोळे दाखवायचं, आज खायला महाग”

“आज आम्ही जेव्हा परदेशात जातो, देशाचं नाव भारत सांगतो त्यावेळी लोक डोळे फाडून आमच्याकडे बघतात. भारत, मोदीजी असं विचारतात. आम्हाला याचा केवढा मोठा अभिमान आहे. पाकिस्तानसारखं राष्ट्र आम्हाला नेहमीनेहमी डोळे दाखवायचं. आज पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही, खायला महाग झाले आहेत,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलं, प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा स्वागत करा की…”

“आता चीनही भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाही”

“आता चीनही भारताकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. कुणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे भारताला एक सक्षम पंतप्रधान लाभले आहेत,” असंही गिरीश महाजन यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big statement of girish mahajan about identity of india in world pbs