१ जुलै रोजी मुंबईत ठाकरे गटाकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी शिवसेना भवनावर बैठकांचं सत्र सुरू आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या गाडीला एका दुचाकीने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज दुपारी आदित्य ठाकरे एका बैठकीसाठी शिवसेना भवन येथे जात असताना एका दुचाकीस्वाराने आदित्या ठाकरेंच्या गाडीला धडक दिली आहे. यानंतर सुरक्षारक्षक तातडीने कारमधून बाहेर आले. रस्त्यावरही काही वाहतूक पोलीस आणि सुरक्षारक्षक धावत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षारक्षकांनी दुचाकीला पाठीमागून पकडलं.

हेही वाचा- मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “आता सरकार पडेल…”

हा अपघात मोठा नसला तरी आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षारक्षकांनी दुचाकीस्वाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“१ जुलैला मुंबईत महामोर्चा”

बुधवारी प्रसारमाध्यमांना महामोर्च्याची माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “१ जुलैला मुंबईत महामोर्चा काढणार आहोत. गेल्या एक वर्षापासून मुंबईत प्रशासक आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा किंवा जनतेचा प्रतिनिधी नाहीये. ना नगरसेवक, ना महापौर ना कुठले समिती अध्यक्ष आहेत. हे कुणी नसताना तिथे मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहेत. यामुळे १ जुलै रोजी दुपारी चार वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. सर्व मुंबईकर या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. मुंबईचे हाल होतायत, असं ज्यांना वाटतंय, ते सगळे नागरिकही या मोर्च्यात सहभागी होणार आहेत.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike hits aaditya thackeray car in mumbai video viral rmm
Show comments