रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळेकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणा-या तरूणाच्या दुचाकीला बसणी-नागझरी येथील वळणावर टाटा सुमोची जोरदार धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले.  या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरूणी किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाली येथील राहणारा सौरभ मधूकर काजरेकर (वय २५, रा. डोंगरेवाडी-पाली, रत्नागिरी) हा गणपतीपुळेकडून दुचाकी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. त्याच्या दुचाकीच्यामागे त्याची मैत्रिण वृषाली जगदीश धाडवे (वय २१, रा. उमरे-चांदेराई) ही बसली होती. भरधाव वेगात असलेल्या टाटा सुमोची सौरभच्या दुचाकीला धडक बसली.

हेही वाचा >>> छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटे याला न्यायालयीन कोठडी

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan : “…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन् मोदी सरकार कोसळेल”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
eknath khadse devendra fadnavis
Eknath Khadse : “फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेलं की…”, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम

दोघेही रस्त्यात कोसळले देवगडवरून काही तरूण टाटा सुमो घेऊन गणपतीपुळेला निघाले होते. बसणी-नागझरी येथील वळणावर भरधाव सुमोने रत्नागिरीच्या दिशेने येत असलेल्या  दुचाकीला जोरदार धडक  दिली.  दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सौरभच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र ही धडक इतकी मोठी होती की, सौरभच्या डोक्यातील हेल्मेट २५ फूट लांब चेंडूसारखे उडाले व त्याची दुचाकी रस्त्यावरून फरफटत रस्त्याच्या कडेला उडाली. या अपघाताचा आवाज झाल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या तरूणीने आरडाओरड करायला सुरूवात केली. हा आवाज ऐकून तेथील स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताच्या दिशेने धाव घेतली. बसणी- नागझरी येथे झालेल्या अपघातानंतर सौरभ व वृषाली हे दोघेही रस्त्यात कोसळले.

हेही वाचा >>> पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबार

सौरभ याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रस्त्यात पडला होता.  त्याला स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून  या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. गणपतीपुळे येथून सुमो सुसाट वेगाने निघाली असताना  स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करून देवगड येथील सुमो अडवली. या गाडीमध्ये ५ ते ६ तरूण होते. ते गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुमो चालक केतन नवलकोंदे (वय २०, रा. देवगड) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध  पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.