रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळेकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणा-या तरूणाच्या दुचाकीला बसणी-नागझरी येथील वळणावर टाटा सुमोची जोरदार धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरूणी किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाली येथील राहणारा सौरभ मधूकर काजरेकर (वय २५, रा. डोंगरेवाडी-पाली, रत्नागिरी) हा गणपतीपुळेकडून दुचाकी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. त्याच्या दुचाकीच्यामागे त्याची मैत्रिण वृषाली जगदीश धाडवे (वय २१, रा. उमरे-चांदेराई) ही बसली होती. भरधाव वेगात असलेल्या टाटा सुमोची सौरभच्या दुचाकीला धडक बसली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा