जेट एअरवेजच्या मुंबई – औरंगाबाद विमानाला पक्षी धडकला असून, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबई विमानतळावरुन विमानाने उड्डाण केले होते. लँडिंगदरम्यान विमानाला पक्षी धडकला असून गेल्या काही तासांपासून विमान औरंगाबाद विमानतळावर आहे. पंख्यात पक्षी अडकल्याने विमानाचा आणि प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

पक्षी अडकल्याने विमानात तांत्रिक बिघाड झाला असून तो दुरुस्त करण्यात येत आहे. हेच विमान मुंबईसाठी उड्डाण करणार असल्याने मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आलेले प्रवासी खोळंबले आहेत. सध्या औरंगाबादहुन मुंबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले आहे.