संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ या वर्षी लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर झाला आहे. आज, शनिवारी या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. लोककला, लावणी व तमाशा कला जोपासण्याचं काम आयुष्यभर करणाऱ्या यमुनाबाई वाईकर यांना या वर्षीचा पुरस्कार देण्यात आल्याचे संगीत कला केंद्राचे सचिव ललित डागा यांनी कळविले आहे. टाटा थिएटर नरिमन पॉईन्ट मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. रुपये दोन लाख रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या  पुरस्काराने अत्यानंद झाल्याचे ९२ वर्षांच्या यमुनाबाई वाईकर यांनी सांगितले.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birla kalashikar award for yamuna bai waikar