Devendra Fadnavis : विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता भाजपाचं शिर्डीत महाविजय अधिवेशन पार पडत आहेत. या अधिवेशनासाठी राज्यातील भाजपाचे सर्व नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचं हे अधिवेशन महत्वाचं मानलं जात आहे. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला आपण पाहिलं’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो महाविजय प्राप्त झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत. कारण जनतेमुळे हा महाविजय मिळाला. आपल्या या लढाईमध्ये २४ तास आपल्याबरोबर अमित शाह होते. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर कार्यकर्त्यांना लक्षात येत नव्हतं की आपलं काय चुकलं? मात्र, अशा परिस्थितीत अमित शाह यांनी विविध ठिकाणी मेळावे घेत आपल्याला मार्गदर्शन केलं, कार्यकर्त्यांच्या मनात ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर भाजपाने महाविजय मिळवला. आज आपण शिर्डीत हे महाविजय अधिवेशन घेत आहोत याचा मला आनंद आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray (1)
Devendra Fadnavis : “आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका!
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

हेही वाचा : “तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नही…”, आशिष शेलारांचा शेरोशायरीतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

“साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भाजपात महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आणि नंतर सबुरी म्हणजे आपण. हा मंत्र आपण सर्वजण पाळत असतो. आपल्याला माहिती आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले. पण श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांना समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.

‘भाजपाने ८९ टक्के गुण मिळवले अन्…’

“महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला एक नाही तर तीन वेळा भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा दिल्या. ३० वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त जागा मिळवणारा आपला पक्ष आहे. आपण पाहतो की जसं जी-२० असतं, जी-७ असतं. तसं भाजपाचं जी-६ तयार झालं, म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्ये प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणाबरोबर आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी १७ जागा आपल्या निवडून आल्या. जेमतेम ३५ टक्के मार्क घेऊन आपण काठावर पास झालो होतो. मात्र, त्यानंतर आपण विधानसभेला २८८ पैकी २३७ जागा आपण जिंकल्या आणि ८२ टक्के गुण मिळवले. भाजपाने तर ८९ टक्के गुण मिळवले आणि आपला पक्ष मेरिटमध्ये पास झाला”, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

Story img Loader