चंद्रपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत असून भाजप व काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. शिवसेनेची शक्ती मर्यादित असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ नावापुरता असल्याने २९ हा बहुमताचा आकडा गाठताना सर्वच पक्षांची दमछाक होणार आहे.
जिल्हा परिषदेत ५६ जागांवर ३३१ व पंचायत समितीच्या १२२ जागांवर ५६३, असे एकूण ८९४ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या जि.प.मध्ये असलेली सत्ता टिकवून ठेवण्याचे आवाहन भाजपचे नेते म्हणून अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यावर आहे. मात्र, बहुतांश मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे, तर काही क्षेत्रांत राष्ट्रवादी व काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांच्या वर्तुळात नाराजी आहे. ती दूर करण्यासोबतच स्वपक्षीय उमेदवारांना विजयी करण्याचे मोठे आवाहन भाजपच्या या दोन्ही मंत्र्यांसमोर आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चिंतलधाबा-घोसरी जि.प. क्षेत्रात त्यांचे कट्टर समर्थक व घुग्घुस येथून खास निवडणुकीसाठी आयात केलेले विद्यमान बांधकाम सभापती देवराव भोंगळेंविरुद्ध काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य विनोद अहिरकर यांच्यात सरळ लढत आहे. तसेच देवाडा-केमारा येथून जि.प.चे माजी अध्यक्ष व काँग्रेस उमेदवार प्रकाश पाटील मारकवारांविरुद्ध भाजपचे संतोषवार यांच्यात सामना आहे. बल्लारपूर व मूल तालुक्यातही भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी सरळ लढत असल्याने मुनगंटीवार आपल्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. मारोडा-राजोली क्षेत्रात भाजपच्या विद्यमान जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले व काँग्रेसच्या वैशाली पुल्लावार यांच्यात लढाई आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार अ‍ॅड. संजय धोटेंविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे व शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, असा तिहेरी सामना रंगला आहे. राजुरा क्षेत्रात आमदार भाजपचा असला तरी ग्रामीण क्षेत्रावर काँग्रेस व शेतकरी संघटनेचे वर्चस्व असल्याने आमदार अ‍ॅड. धोटे यांना परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे धोटे-चटप-अ‍ॅड. धोटे याच क्षेत्रात अडकून पडले आहेत.

वडेट्टीवार यांना आव्हान
विधिमंडळ उपनेते व काँग्रेसचे जिल्ह्य़ातील एकमेव आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासमोर भाजपने ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर आव्हान उभे केले आहे. मात्र, या क्षेत्रात भाजपमध्ये बंडखोरी अधिक असल्याने आणि माजी आमदार प्रा. अतुल देशकर मवाळ असल्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. वडेट्टीवारांनी येथे राजकारण करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या बोथली-कवठी या पारंपरिक जि.प. क्षेत्रातून नंदा अल्लुरवार यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन अर्धी लढाई जिंकली आहे. येथे अल्लुरवारांविरुद्ध भाजपच्या मनीषा चिमूरकर व राष्ट्रवादीच्या भोयर यांच्यात तिरंगी लढत आहे. वडेट्टीवारांच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीला येथे खिंडार पडले आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जि.प. क्षेत्रात भाजपचे आमदार बंटी भांगडिया, मितेश भांगडियांविरुद्ध माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर अशी थेट लढत आहे. शंकरपूर जि. प. क्षेत्रात डॉ. सतीश वारजूकर ही काँग्रेसची एकमेव जागा सोडली तर येथे भाजपला संधी आहे.
वरोरा विधानसभा मतदारसंघातील जि.प. व पंचायत समितीत शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकरांविरुद्ध भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी पालकमंत्री संजय देवतळे व काँग्रेसचे डॉ. विजय व डॉ. आसावरी देवतळे दाम्पत्य, अशी तिरंगी लढत होत आहे. येथे केंद्रीय मंत्री अहीर यांनी दत्तक घेतलेल्या चंदनखेडा क्षेत्रात काँग्रेसचे दिनेश चोखारेंविरुद्ध भाजपचे मारुती गायकवाड व शिवसेनेचे सुशीर मुळेवार, असा तिरंगी सामना आहे, तर खांबाडा-चिखली क्षेत्रातून काँग्रेसच्या डॉ. आसावरी देवतळेंविरुद्ध भाजपच्या ढोबळे व मत्ते यांच्यात लढत आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील घुग्घुस, नकोडा-मारडा, दुर्गापूर, ऊर्जानगर, ताडाळी या क्षेत्रातही भाजप विरुद्ध काँग्रेस शिवसेना अशीच लढत आहे. काँग्रेसने चंद्रपूर विधानसभेची जबाबदारी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यावर सोपवल्यामुळे येथे पुगलिया विरुद्ध मुनगंटीवार व आमदार नाना शामकुळे यांचा कस लागणार आहे.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
minor boy killed by father and brother over talking to girl
पुणे : अल्पवयीन मुलाची हत्या; मुलीशी बोलत असल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून
BJP Nitesh Rane kerala mini pakistan statement
नितेश राणे यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ?

Story img Loader