२०१७ साली मला आणि अजित पवार यांना सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. पण, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. काही कारणास्तव ते सरकार स्थापन झालं नाही. नाहीतर २०१७ सालीच भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असते, असं विधान अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंनी केलं आहे. ते कर्जतमधील अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.

सुनील तटकरे म्हणाले, “२०१७ साली मला आणि अजित पवारांना सत्तेत सहभागी होण्याबद्दल सांगण्यात आलं. परंतु, मी आणि अजित पवार सत्तेत सहभागी झालो नाही. सात-आठ महिने चर्चा झाल्या, लोकसभेच्या जागा, खाती, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदेही ठरली होती. पण, काही कारणास्तव ते सरकार बनलं नाही. नाहीतर २०१७ साली भाजपा आणि राष्ट्रवादीचं स्थापन झालं असते.”

police constable arrested for accepting bribe of rs 3 thousand on google pay
वसई: ‘गुगल पे’ वरून स्वीकारली ३ हजारांची लाच; पोलीस शिपायाला रंगेहाथ अटक
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
centre to announce new national cooperative policy drafted by panel of 47 member
नवीन राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच; पुढील दोन-तीन महिन्यांत घोषणा अपेक्षित
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
malvan Shivaji maharaj statue collapse
Chetan Patil : शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी फक्त…”
Nagpur, Mohan Bhagwat, RSS, Mohan Bhagwat s Security Upgraded, security upgrade, Union Home Ministry, Z Plus security,
मोठी बातमी! मोहन भागवत यांना मोदी, शहांच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
Ajit Pawar On Badlapur Crime Case
Ajit Pawar : “असा दरारा निर्माण झाला पाहिजे की पुन्हा…”, बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका

हेही वाचा : “७० हजार कोटींवरून अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं, कारण…”, सुनील तटकरेंचं विधान

“घड्याळ तेच, वेळ नवी”

“सरकार स्थापन झालं नाही, म्हणून कर्जतमध्येच पक्षाचं शिबीर पार पडले होते आणि तिथून नवीन दिशा घेऊन आपण कामाला लागलो. आता, त्याच कर्जतमध्ये आपलं शिबीर आहे. ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ या विचारांनी आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे,” असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.

हेही वाचा : “भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना ‘नालायक’ नाही म्हणायचे, तर…”, ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“२०१९ साली जयंत पाटलांसह अन्य आमदारांच्या सह्यांचं निवेदन”

“२०१९ साली पहाटेचा नाहीतर सकाळी ८ वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. पण, तेव्हा अजित पवारांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचं निवेदन तयार करण्यात आलं होतं. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ठाण्यातील आमदाराचींही सही होती,” असे म्हणत सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं.