सोलापूर : आगामी लोकसभेसह विधानसभा निवडणुकांचेही वारे वाहात असताना सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या विरोधात शडूडू ठोकण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांच्या बालेकिल्ल्यात जुन्या विडी घरकूल परिसरात विकास कामाचे श्रेय घेण्यावरून देशमुख व कोठे समर्थक एकमेकांना भिडले. नंतर हे प्रकर थेट पोलिसांपर्यंत गेले.

हेही वाचा >>> सातारा : कोयना जल पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरण, विकास आणि स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य – मुख्यमंत्री

baba amte loksatta news
वंचितांच्या सेवेची पंचाहत्तरी…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
घरगड्यांच्या गर्दीत सामील भाजपाई
Deshmukh and Thakur clashed after BJPs Charan Singh thakur halted deshmukhs approved development works
माजी गृहमंत्र्यांची मंजूर कामे भाजप आमदाराने थांबवली
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
Ramdas Athawale appeal Sharad Pawar NDA
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन
Ajit Pawar avoided sitting next to Sharad Pawar
शरद पवार यांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले, नावाची प्लेट बदलण्यास…
Friction between Mahayuti allies intensifies with guardian ministership issue
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला का गेले? राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मनोमीलन का नाही?

हैदराबाद मार्गावरील इंदिरा गांधी विडी घरकूल परिसरात देशमुख व कोठे समर्थकांत हाणामारी झाल्यानंतर आमदार विजय देशमुख व महेश कोठे हे दोघेही विडी घरकुलात धावून आले. नंतर एकमेकांच्या विरोधातहे दोन्ही नेते  एमआयडीसी पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. तेथे एकमेकांविरूध्द गुन्हे दाखल होण्यासाठी वाद सुरू होता.

विडी घरकूल परिसर महेश कोठे यांचा बालेकिल्ला मानला जातो. १९९२ पासून कोठे हे याच भागातून महापालिकेवर आजतागायत सलग प्रतिनिधित्व करीत होते. याच भागातील वैष्णवी मारूती मंदिरापासून ते राज इंग्रजी शाळेपर्यंतच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाले आहे. या रस्त्याच्या  विकास कामाचे आणि उद्घाटनाचे श्रेय घेण्यावरून कोठे आणि देशमुख समर्थकांमध्ये वाद उफाळून आला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात भाजपचे देशमुख गटाचे सतीश  कल्लप्पा भारमशेट्टी व लक्ष्मी सतीशा भरमशेट्टी (रा. सरवदेनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) हे दाम्पत्य जखमी झाले. कोठे समर्थकांपैकी काहीजण जखमी झाले असून त्यांची नावे लगेचच समजू शकली नाहीत.

हेही वाचा >>> ‘तेव्हा गुवाहाटीसाठी भास्कर जाधवदेखील बॅग भरून..’, आमदार योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

दरम्यान, या घटनेप्रकरणी आमदार विजय देशमुख यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर महेश कोठे म्हणाले, मी सोलापूर शहर विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे समजताच भाजपला पोटदुखी सुरू झाली आहे. विजय देशमुख हे गेल्या २० वर्षांपासून या भागाचे आमदार आहेत. परंतु विडी घरकूल परिसराच्या विकासासाठी किती निधी  उपलब्ध करून दिला ? आताच त्यांना विडी घरकुलाचा पुळका कसा आला, असा सवाल कोठे यांनी केला. विडी घरकुलातील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू झाल्याचा आरोपही कोठे यांनी केला.

Story img Loader