गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून सातत्याने भाजपाला लक्ष्य केलं जात आहे. एकनाथ शिंदे गटाप्रमाणेच आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही फोडण्याचे प्रयत्न भाजपाकडून चालू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकदा केला आहे. त्यासंदर्भात महाविकास आघाडीतील इतर काही नेत्यांनीही दुजोरा दिल्यानंतर आता त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. संजय राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरात केलेल्या दाव्यावरून राजकीय वातावरण तापलं असून त्यावरून आता भाजपानंही समाचार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांचा दावा नेमका काय?

संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक या सदरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा एक संदर्भ दिला आहे. “मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही”, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

“कोणतंही लग्न व्हायचं असेल तर…”, अजित पवार सरकारमध्ये जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचं सूचक विधान!

“जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडले. शरद पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, “आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत” असंही संजय राऊतांनी नमूद केलं आहे.

“मतदारसंघात साधा…”, धनंजय मुंडेंचं पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीकास्र; म्हणाले, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत…”

“आम्हाला मदत करणाऱ्यांचं स्वागतच आहे”

दरम्यान, संजय राऊतांच्या या दाव्यावर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “संजय राऊत यांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना त्यांच्या पक्षाबद्दल काय म्हणायचंय याची प्रतिक्रिया संजय राऊत देत आहेत. त्याला महत्त्व किती द्यायचं. त्याची किंमत काय? राजकारण राजकारणाच्या जागी असेल. सरकार भक्कमपणे काम करतंय. आम्हाला कुणीही समर्थन दिलं तर स्वागतच आहे. आम्हाला जो मदत करेल, त्याचं स्वागतच आहे”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar mocks sanjay raut claim on sharad pawar ncp pressure on family pmw
Show comments