राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं असून विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतल्याने राठोड यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे राजकीय संकट निर्माण झालं आहे. त्यातच आता भाजप आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी आपल्याला धमकावलं जात असल्याचा आरोप केला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री; भाजपाने पहिल्यांदाच घेतलं नाव
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा!”
“साहेब तिला जरा समजावून सांगा”, पुण्यातील तरुणी आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल
अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याची टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,” असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचे नाव न घेता चौकशीची मागणी करणारे पत्र पोलीस महासंचालकांना दिले असताना या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली होती.
फडणवीस यांनी कोणाचंही नाव घेणं टाळलं असताना शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या सगळ्या तपशिलांचा रोख शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्वत: (स्यु-मोटोतंर्गत) तक्रार दाखल करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.