लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असे यश मिळवले. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झाला. या विजयानंतर सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

आमदार गाडगीळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा, निर्णयांचा आणि विकासकामांचा हा विजय आहे. दिल्लीतील निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्षाच्या आसेतू हिमाचल विजयाची आणि संपूर्ण देशाची विकासाकडे सुरू असलेली घोडदौड अधिकच अधोरेखित झाली आहे.

सांगली शहरासह जिल्ह्यातही भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, सिद्धार्थ गाडगीळ, भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश तात्या बिर्जे, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, सरचिटणीस केदार खाडिलकर, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader