धुलिवंदनाच्या निमित्ताने राज्यात राजकीय धुळवड देखील रंगू लागली आहे. नेतेमंडळी विरोधकांवर आरोप करत असताना त्यांना तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर देखील दिलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सिल्व्हर ओकवर झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये “घाबरू नका, मी भाजपाला पुन्हा महाराष्ट्रात सत्तेवर येऊ देणार नाही”, असं विधान करून चर्चेची राळ उडवून दिली. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून भाजपाकडून या विधानाचा खोचकपणे समाचार घेण्यात येत आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये एबीपीशी बोलताना शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत म्हणाले होते. तसेच, भाजपाकडून परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन अशा गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचं देखील पवारांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, याच विधानाचा संदर्भ घेत आता भाजपाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

mayura kale
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर

“गरजेल तो पडेल काय”

जो गरजेल, तो पडेल काय? अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीत कुणालाही काहीही बोलायचा अधिकार आहे. पण गरजेल तो पडेल काय? आम्ही आमचं काम शांतपणे करतोय. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत ते दिसेल. आणि त्या बैठकीत जाता जाता शरद पवारांनी तरूण आमदारांना हेही सांगितलं की भाजपाच्या नेतृत्वापासून काहीतरी शिका. म्हणजे आमच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“शरद पवार साहेब, भाजपाची काळजी करू नका, तुम्ही पावसात भिजूनही…”, निवडणुकांवरून भाजपाचं खोचक प्रत्युत्तर!

नेतेमंडळींनी बोलण्याची पद्धत बदलावी..

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील नेतेमंडळींना सल्ला दिला आहे. “राजकीय नेत्यांनी त्यांची बोलण्याची-वागण्याची संस्कृती बदलली पाहिजे. महाराष्ट्रात मोठे पाचच पक्ष आहेत जे एकमेकांवर चिखलफेक करत असतात. त्यांनी एकत्र बसून यावर निर्णय घेतला पाहिजे. एक राजकीय संस्कृती ठरवली पाहिजे. यासाठी शरद पवार किंवा राज्याचे मुख्यमंत्री काम करू शकतात. बाकीच्यांनी बोलवलं तर सगळे म्हणतील तुम्ही कोण बोलवणार? त्यामुळे आम्ही तो पुढाकार घेणार नाही. उद्धव ठाकरे, शरद पवारांनी एकत्र बसून त्यावर काम करायला हवं”, असं पाटील म्हणाले.

“सध्याची राजकीय धुळवड दु:खाची”

“धुळवड म्हटल्यावर एकमेकांवर रंग फेकणं. पण त्यात आनंद असतो. महाराष्ट्रात जी राजकीय धुळवड सुरू आहे, त्यात एकमेकांवर फेकाफेकी करण्यामध्ये आनंद नाही तर दु:ख आहे. कुणी पुढाकार घेऊन हे संपवायचं यावर एकमत होत नाहीये. भाजपा नेहमीच तयार आहे. एकत्र बसा, एक राजकीय संस्कृती ठरवा. पण तीन पक्ष एकत्र येऊन का होईला, पण सत्ता आली म्हटल्यावर ती इतकी डोक्यात शिरली, की आधीच्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करा वगैरे सुरू आहे. ही राजकीय धुळवड आनंदाची नसून दु:खाची आहे”, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.