भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राज्यात गेल्या वर्षी आजच्याच दिवशी भाजपाकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयत्नाला वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उजाळा दिला आणि भाजपाच्या जखमांवर मीठ चोळले. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे. सांगलीतल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आहे “आता कितीही गोडवे गायले तरीही गेल्या वर्षी तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांना काकांना सोडले होते हा इतिहास आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार हे अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा