BJP Chandrashekhar Bawankule On SHarad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली माहायुतीने बाजी मारली आहे. भाजपा आणि मित्रपक्षांनी बहुमताचा आकडा गठला असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. . दुसरीकडे महाविकास आगाडीकडून निवडणुक निकालांवर शंका घेतली जात आहे. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या पराभवामाहे ईव्हीएम (EVM) मशीनचा हात असल्याचा दावा करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील ईव्हीएमवर शंका घेणारे वक्तव्य केले आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या सारख्या अनुभवी नेत्याने ईव्हीएमवर शंका घेणे हे न पटणारे असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या विरोधात जे होते त्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपाकडे गेलं. त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना उशिरा घेतली आणि नंतरही ती झारखंडबरोबर घेतली. झारखंडमध्ये काँग्रेसला यश आहे आणि इथं (महाराष्ट्रात) अपयश आहे. त्यामुळे लहानसं राज्य विरोधकांच्या यशासाठी आणि मोठं राज्यं सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी असा काहीतर गंमतीदार ट्रेंड दिसतो. म्हणजे उद्या कोणी मशीनसंबंधी (EVM) आक्षेप घेतला तर म्हणता येईल की मशीनसंबंधी तुम्ही आक्षेप घेता, पण त्या राज्यात तुमची सत्ता आली ना, तेव्हा हेच मशिन होतं” असे शरद पवार म्हणाले होते.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

तसेच ईव्हीएमबद्दल पुढे बोलताना त्यांनी, “आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

हेही वाचा >> काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधींचा माइक बंद; संविधान दाखवत सावरकरांबद्दल म्हणाले…

बावनकुळे काय म्हणाले आहेत?

शरद पवारांनी उपस्थित केलेल्या शंकेबद्दल प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे जिंकल्या आणि सुनेत्रा पवार पराभूत झाल्या तेव्हा तुम्हाी का बोलला नाहीत अशा सवाल त्यांनी पवारांना केला.

“शरद पवार यांच्यासारख्या प्रगल्भ आणि अभ्यासू व्यक्तीने निवडणुकीत पराभव झाल्यामुळे असे बोलणे मला न पटणारे आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. किमान त्यांनी तरी असा विचार करू नये… मग बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि सुनेत्रा पवार हरल्या तेव्हा तुम्ही का नाही बोललात? तुम्ही चार महिन्यांपूर्वीचे विसरून गेलात. सुनेत्रा पवार त्या ईव्हीएम मशीनमुळे हरल्यात… आमच्या वहिनी हारल्या, सुप्रिया सुळे निवडून आल्या त्यावेळेस तुम्ही बोलला असतात तर बरं झालं असतं”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Story img Loader