आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप होतो आहे. त्यावरुन विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. अशात आता असा प्रकार घडलेला नाही. विरोधक राजकारण करत आहेत, खरंतर अशा गोष्टींचं राजकारण करायचं नसतं तरीही ते केलं जातं आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षा भयंकर घटना घडली होती असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा भयंकर घटना घडली होती. चेंगराचेंगरीचे प्रकारही झाले होते. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून सरकारने व्यवस्था उभी केली. याविषयीची संपूर्ण माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना आणि जनतेला दिली. सरकारकडून त्यांनी आवाहनही केलं की विरोधी पक्षाने राजकारण करु नये. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी घटना घडली तेव्हा आम्हीही राजकारण केलं नाही. उलट मदत कशी पोहचवता येईल यावरच भर दिला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस काही गोष्टी आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत. मात्र सरकारने आवाहन केलं आहे तर ते स्वीकारलं पाहिजे. हा विषय राजकारणाचा नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. वारकऱ्यांच्या घटनेवर त्यांनी हे भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Shivsena Eknath Shinde Rebel Winner Candidates List in Marathi
Shivsena Eknath Shinde Rebel Candidates Result : एकनाथ…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”

एकनाथ शिंदेंनी ठरवावं भाजपा का हस्तक्षेप करेल?

भाजपाचा मी ३२ वर्षांपासून कार्यकर्ता आहे. कुणाच्या अधिकारात हस्तक्षेप केला जात नाही. कुणाला मंत्री ठेवायचं किंवा कुणाला नाही हा संपूर्णपणे एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. आमचं युतीचं सरकार आहे. भाजपात कोण मंत्री व्हावं हे भाजपा ठरवतं. एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांविषयी ठरवतील. आमच्यात काहीतरी भांडण लागावं म्हणून अशा पुड्या सोडल्या जात आहेत असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अडवताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मात्र तो लाठीमार झालेला नाही, किरकोळ झटापट झाल्याचा खुलासा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला होता. तर विरोधी पक्षांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. असं असतांना रविवारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.