BJP Journey From Loksabha to Vidhan Sabha Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल राज्यात आधीच अस्तित्वात असणारी सत्ता समीकरणं ठळक करणारे असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. महायुती सत्तेत होती, पुन्हा सत्तेत आली आणि मोठ्या विजयानं सत्तेत आली. महाविकास आघाडी विरोधात होती, त्यांची आणखी पीछेहाट झाली आणि ते विरोधातच राहिले. पण वरवर पाहता हे निकाल इतके सरळ वाटत असले, तरी या निकालांमुळे इतरही अनेक गोष्टी घडल्याचं दिसून येत आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षासाठी यंदाच्या निवडणुकांचे निकाल अनेक अर्थांनी फायदेशीर आणि राजकीय प्रवाह स्पष्ट करणारे ठरले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं त्यासंदर्भात सविस्तर विश्लेषण केलं आहे.

भाजपासाठी या निवडणुकीत काय बदललं, हे पाहण्यासाठी लोकसभा निवडणूक निकालांपासून सुरुवात करावी लागेल. ४ मे २०२४ अर्थात जवळपास सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक निकाल लागले. तेव्हा भाजपाची ३०३ जागांवरून थेट २४० जागांवर पीछेहाट झाली. महाराष्ट्रात पक्ष २३ जागांवरून ९ जागांपर्यंत मागे आला. त्यामुळे सतताधाऱ्यांविरोधात राज्यात व्यापक जनमत तयार झाल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आपल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रात तयार झालेलं हे मत भाजपानं सहा महिन्यांत जवळपास पूर्ण फिरवलं.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!

‘एनडीए’ ते ‘भाजपा’!

लोकसभा निकालांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात एनडीएचं महत्त्व वारंवार अधोरेखित केलं. गेल्या काही दशकांमध्ये अनेक पक्ष सोबत आले किंवा सोडून गेले, तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडी कायम राहिल्याचं मोदींनी अधोरेखित केलं. पण एकुणात ‘भाजपा’पेक्षा ‘एनडीए’ या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात प्रयत्नपूर्वक ठसवलं. पण ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीवेळी दिसलेलं चित्र भाजपासाठी पूर्ण वेगळं आणि सकारात्मक होतं.

महाराष्ट्रात विक्रमी विजय मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळी अनेक दिग्गज नेते व सेलिब्रिटिंनी हजेरी लावली. यातले बहुतांश दिग्गज हे शिवसेना किंवा राष्ट्रवादीपेक्षा भाजपाच्या परिघातले असल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचं वाढलेलं महत्त्व आणखी एका गोष्टीवरून चांगलंच अधोरेखित झालं. निकाल लागल्यानंतरही पुढचे जवळपास १० दिवस एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सामील होण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. पण त्यांच्या मौनाकडे भाजपानंही तितक्याच सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”

यादरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंनी किंवा त्यांच्या पक्षाकडून सातत्याने हीच भूमिका मांडण्यात आली की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल. पण तरीदेखील शपथविधीच्या अवघ्या दोन तास आधीच एकनाथ शिंदेंनी आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार असल्याचं जाहीर केलं!

एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न

या काळात भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे काही प्रयत्न झाले. पण त्याचवेळी त्यांना महायुतीतील पक्षांमध्ये असणाऱ्या जिंकून आलेल्या जागांच्या मोठ्या फरकाचीही जाणीव करून देण्यात आल्याचं सांगितलं जातं. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं की “जेव्हा कुणी आकाशात असतो, तेव्हा त्याला जमिनीवर आणायला वेळ जातोच. आम्हाला खात्री होती की आम्हाला जे हवंय तेच होणार. पक्षाच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून हवे होते. आम्ही फक्त वाट बघत होतो की एकनाथ शिंदे कधी या गोष्टीचा विचार करतायत की त्यांच्या पक्षाचं भवितव्य एनडीएमध्ये राहण्यातच आहे.”

केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे संख्याबळ कमी असलं आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर त्यांना सरकार स्थापन करावं लागलं असलं, तरी लोकसभा निवडणूक निकालांनंतरच्या सहा महिन्यांत सत्तेचा हा लोलक भाजपाच्या बाजूने गेल्याचं त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवरून स्पष्ट होऊ लागलं आहे.

भाजपाचा पक्षांतर्गत संदेश!

गेल्या वर्षापासून झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारख्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं चर्चेतले सगळे चेहरे टाळून भलत्याच व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचा जणू प्रघातच पाडला होता. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचं केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेणार? याची उत्सुकता लागलेली होती. पण पक्षानं महाराष्ट्रात आपला हा प्रघात मोडत देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. हा भाजपाच्या पक्षांतर्गत पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना संदेश मानला जात आहे.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना घवघवीत यश मिळालं खरं, पण आता कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?

याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांचा महायुतीमध्ये आणि सरकारमध्ये समावेश असताना पक्षाला देवेंद्र फडणवीसांसारखी व्यक्तीच मुख्यमंत्रीपदी असणं आवश्यक होती, असं एका भाजपा नेत्यानं सांगितलं.

“यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पक्षात पुन्हा एकदा प्रादेशिक स्तरावरील नेतृत्वाचं महत्त्व वाढताना दिसत आहे. २०२३ च्या शेवटापर्यंत असं म्हटलं जात होतं की येडीयुरप्पा, वसुंधरा राजे आणि शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्रीपदी न राहिल्यामुळे भाजपात सत्तेचं केंद्रीकरण होऊ लागलं आहे. पण आता पक्षात काही खूप प्रसिद्ध आणि तुलनेनं तरुण मुख्यमंत्रीही आहेत. त्यात योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्व सरमा आणि आता देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाला आहे”, असं भाजपातील एका नेत्याने सांगितलं.

महाराष्ट्रात आता राजकीय स्थिती काय?

विधानसभा निकालांनंतर महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ भाजपानं प्रभावित असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वाधिक १३२ आमदार भाजपाचे आहेत. सत्ताधारी गटात त्यामुळे भाजपाचं प्रचंड वर्चस्व आहे. महाविकास आघाडीला तर भाजपानं केव्हाच मागे सोडलं आहे. मविआमध्ये शरद पवारांसमोर अजित पवारांचं आव्हान आहे, उद्धव ठाकरेंना तशाच प्रकारचं आव्हान एकनाथ शिंदेंकडून आहे. आणि काँग्रेस पराभवातून धडा घेऊन पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करते आहे.

Story img Loader