नंदुरबार/मुंबई /पुणे : नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे भाजपसह सर्वच पक्ष संभ्रमात पडले आहेत. मोदींच्या वक्तव्याचे सर्वपक्षीय पडसाद उमटले असून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नंदुरबार येथे भाजप उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी, ‘‘नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी मनाची तयारी केली आहे, पण ४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छाती फुगवून आमच्याकडे यावे,’’ असे आवाहन केले. मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहाही शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उल्लेख वारंवार ‘नकली सेना’ असा करीत आहेत. तेलंगणातील एका सभेत तर मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बाळासाहेबांची ‘नकली संतान’ असा केला होता.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Constituent parties Shiv Sena and NCP in Mahayuti in Vasai are upset
वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
The ploy of power by creating conflicts between castes Prime Minister Narendra Modi accuses Congress Print politics news
जातीजातीत भांडणे लावून सत्तेचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
Kalyan, Dombivli rebels, Kalyan, Dombivli, campaigning,
कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब; बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी
nandgaon assembly constituency
वंचितच्या नांदगाव माजी तालुकाध्यक्षांना माघारीसाठी धमकी

पवार आणि ठाकरे यांनी ‘रालोआ’मध्ये सामील व्हावे या मोदींच्या नंदुरबारमधील प्रस्तावाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी,‘‘आम्ही नेहरू-गांधी यांची विचारसरणी मानणारे आहोत. नेहरू-गांधींची विचारधारा देशाला एकत्रित ठेवणारी आणि ऐक्याची आहे. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशातील संसदीय लोकशाही संकटात आली आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही,’’ अशी टीका केली. पंतप्रधानपद हे घटनात्मक असल्याने त्या पदावरील व्यक्तीने जाहीर वक्तव्ये करताना तारतम्य बाळगले पाहिजे. आक्षेपार्ह विधाने टाळली पाहिजेत, असेही पवार यांनी सुनावले.

हेही वाचा >>>सोलापूरसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्यास प्रारांभ

मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र मोदींच्या प्रस्तावाचे समर्थन केले. ‘‘काँग्रेसकडे जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराच्या पक्षाकडे येणे कधीही चांगले,’’ अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली. जेव्हा एखाद्या पक्षाची ताकद कमी होते, तेव्हा विलिनीकरणाची चर्चा होते. ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांची ताकद कमी झाल्याने ते काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करू लागले आहेत. ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये पूर्वीच विलीन झाला आहे, फक्त विलिनीकरण शब्द लावायचा आहे. त्यांचे काँग्रेसीकरण झाले आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

मोदी यांच्या आवाहनावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी पवार आणि ठाकरे यांना रालोआबरोबर येण्याचा प्रस्तावच दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर छोटय़ा पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, या पवार यांच्या वक्तव्यावर मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.’’ मोदी यांचे विधान स्वयंस्पष्ट आहे. बारामतीच्या जागेवर पराभव होणार, हे पवार यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच छोटय़ा पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, असे वक्तव्य पवार यांनी नैराश्यातून केले आहे. निवडणूक निकालानंतर त्यांची निराशा होणार आहे. पण काँग्रेसलाही भवितव्य राहणार नसल्याने पवार आणि ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन व्हावे, असा सल्ला मोदी यांनी दिला आहे.

मोदींमुळे देशातील संसदीय लोकशाही संकटात आली आहे. त्यांच्या विरोधात जनमत आहे, त्यामुळे भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष

ठाकरे आणि पवार यांच्या पक्षांची ताकद कमी झाली आहे. त्यांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचाराच्या पक्षाकडे येणे कधीही चांगले. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

काँग्रेसलाही भवितव्य नसल्याने पवार आणि ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन व्हावे, असा सल्ला मोदी यांनी दिला आहे. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री