Keshav Upadhye : आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने काढलेल्या जनसन्मान यात्रेबरोबरच शरदचंद्र पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आहे. दरम्यान, यावरून भाजपाने आता शरद पवार गटाला लक्ष्य केलं आहे.

भाजपाने प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत शरद पवार गटावर टीका केली. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली तथाकथित शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निव्वळ निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला फार्स आहे, अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा – BJP : उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या भेटीवर भाजपाची जोरदार टीका, “स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ…”

नेमकं काय म्हणाले केशव उपाध्ये?

“शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली तथाकथित शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निव्वळ निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला फार्स आहे. अन्यथा ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा यांनी रचलेला आहे, त्याच शिवरायांच्या वाघनखांवर यांनी शंका घेतली नसती. तसेच छत्रपतींच्या अजोड पराक्रमाचं आणि औरंगजेबाच्या नामुष्कीचं प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचं महायुती सरकारनं केलेलं नामकरण यांच्या पोटदुखीचं कारण ठरलं नसतं आणि वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणणारा नवा कायदा पाहून यांना पोटशूळ उठला नसता”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “याउलट, ‘मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही’ हा देदीप्यमान इतिहास स्मरणात ठेवून महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन राज्यभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला आहे. शिवरायांच्या शिकवणुकीप्रमाणे रयतेची काळजी वाहणारा राज्यकारभार आमच्या सरकारकडून सुरू आहे. सर्व समाजघटकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवून शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली.”

हेही वाचा – Uddhav Thackeray : “काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंचे हात रिकामे”, भाजपाचा टोला; म्हणाले, “मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत…”

दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “राज्यातल्या महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली; पण विरोधक मात्र रांझ्याच्या पाटलाप्रमाणे या योजनेत मोडता घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब लपून राहिलेली नाही. शिवरायांच्या विचारांची पालखी महायुतीने समर्थपणे आपल्या खांद्यांवर पेलली आहे. तर महाविकास आघाडी नुसतीच शब्दांची भोई बनली आहे”, अशी टीका त्यांनी केली.

Story img Loader