मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात एक असं चित्र पाहण्यास मिळालं जे महाराष्ट्र विसणार नाही. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं पाहण्यास मिळालं. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हे उपरणं उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घातलं. त्यानंतर त्यांनी ते काढून ठेवलं. मात्र भाषणात त्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. आता यासंदर्भातले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाने ( BJP ) उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पोस्ट काय?

ज्या बाळासाहेब ठाकरे यांची सगळी हयात काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात गेली, ज्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून शिवसेना स्थापन केली, रुजवली आणि वाढवली; त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालून बसले आहेत. आपली मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात, अशी अवस्था आता उद्धव ठाकरे यांची झाली आहे. अशी पोस्ट भाजपाचे ( BJP ) प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंचा काँग्रेसचं उपरणं गळ्यात घातलेला फोटोही पोस्ट केला आहे.

Girish Mahajan on Badlapur Protest
Girish Mahajan : “ठराविक लोकांना इथं सोडलं”, बदलापूरच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा विरोधकांवर गंभीर आरोप
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Congress Gamcha and Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, भाषणात उत्तर देत म्हणाले, “उद्या…”
Nana Patole
Nana Patole : “…तर सरकारला वठणीवर आणू”, बदलापूरच्या घटनेवरून नाना पटोलेंचा इशारा
activist manoj jarange slams sharad pawar over maratha reservation
”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Badlapur School case
Badlapur Sexual Assault Case : “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले…
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

नेमकं काय घडलं?

काँग्रेसच्या आजच्या सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे उपरणं घातलं. काही वेळ ते उपरणं उद्धव ठाकरेंनी तसंच ठेवलं. तसंच हसत हसत त्यांनी नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंशी गप्पाही मारल्या. पण नंतर शरद पवारही त्या कार्यक्रमात आले. सुरूवातीला शरद पवारांनी काँग्रेसचे उपरणे घालण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही त्यांच्या गळ्यातील उपरणं काढलं आणि बाजूला ठेवलं.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंचे हात रिकामे”, भाजपाचा टोला; म्हणाले, “मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत…”

उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा काय म्हणाले?

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांनी यावर काँग्रेसच्या उपरण्यावर भाष्य केलं. भाषणाची सुरुवात त्यांनी, “काँग्रेसचे असलात तरीही जमलेल्या माझ्या बंधूनो, भगिनींनो आणि मातांनो” अशी केली. तसंच म्हणाले, “मी आज खरंच काँग्रेसच्या कार्यक्रमाला आलो आहे हे बघायला स्वतःला चिमटा काढून पाहिला. काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचे गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. कारण समोरच्यांचं काही कर्तृत्व नाही. दाखवा काय दाखवायचं ते.” असं उद्धव ठाकरे म्हणाले. असं असलं तरीही भाजपाचे ( BJP ) नेते केशव उपाध्ये यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण उद्धव ठाकरेंना करुन दिली आहे.