अमरावतीमधील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप भाजपानं केला होता. तसेच या हत्या प्रकरणात तबलिगी जमात या संघटनेतील कट्टरवादी सदस्य सामील होते, असा दावा राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) मुंबई येथील न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला. दरम्यान, या प्रकणावरून आता भाजपाने पुन्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीटद्वारे लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात आतंकवाद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण केले, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई हादरली! लोअर परळमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमधील तिघे अल्पवयीन

भाजपाने नेमकं काय म्हटलं?

“२१ जून रोजी रात्री १० च्या सुमारास उमेश कोल्हे यांची ISIS मानसिकतेच्या जिहादींनी गळा चिरून हत्या केली होती. अमरावती पोलिसांनी उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने केली, असे सांगत तपासाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. २१ जून ते २ जुलैपर्यंत अमरावती पोलीस उमेश कोल्हेंची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, हेच माध्यमात सांगत होते. भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतरही पोलीस या घटनेचे गांभीर्य समजून घायला तयार नव्हते. उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, असे सांगून या हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता”, असा आरोपा भाजपाने केला आहे.

“राजस्थानमध्ये कन्हैयालाल हत्याकांडाचा तपास NIAने सुरू केला. त्यामुळेच २ जुलै रोजी तब्बल १२ दिवसांनी अमरावती पोलिसांना यात आतंकवादी अँगल दिसला. अमरावती पोलिसांनी २ जुलै रोजी पत्रक काढून जाहीर केलं की, उमेश कोल्हेची हत्या ही ISIS मानसिकतेच्या जिहाद्यांनी केली. त्यामुळे उमेश कोल्हे प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची चौकशी होणे गरजेचे आहे”, अशी मागणीही भाजपाच्यावतीने करण्यात आली. तसेच सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी राज्यात आतंकवाद फोफावण्यास पोषक वातावरण निर्माण केले, अशा आरोपही भाजपाकडून करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp criticized uddhav thackeray on amravati umesh kolhe murder case spb