येत्या काळात आपलंच सरकार येईल असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यातून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राच भाजपामय करा असा ईश्वराचा एक संकेत आहे. या संधीचा फायदा घेत संपूर्ण महाराष्ट्र भाजपामय केल्याशिवाय राहणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी बोलताना त्यांनी आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, मात्र आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही असाही विश्वास व्यक्त करत येत्या काळात आपलं सरकार येईल असा दावा केला.

आणखी वाचा- “भाजपात गेलेल्या अनेक नेत्यांचे आम्हाला फोन”, जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

“आत्ता आपण धोक्याने बाहेर राहिलो आहोत. जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. आपल्याला दिलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा आपण जिंकलो आहोत. महाराष्ट्राच्या ४० वर्षाच्या इतिहासात एकही पक्ष ७० टक्के जागा जिंकलेला नाही. पण भाजपाने ७० टक्के जागा जिंकल्या. पण दुर्दैवाने ज्यांना आपण सोबत घेतलं होतं त्यांनी जनादेशाशी विश्वासघात केला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- ठाकरे सरकार दहा दिवसांत पाचवा खटला घेणार मागे, ३००० मराठा तरुणांना मिळणार दिलासा

“आम्ही ७० टक्के मार्क घेऊन वर्गात पहिले आलो. पण ४० टक्के मार्क घेणारे तिघे एकत्र आले आणि मेरिटमध्ये आल्याचा दावा करत सत्तास्थापन केली. अशा प्रकारची सत्ता जास्त काळ राहणार नाही,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

Story img Loader