कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेवर उत्तर दिलं असून सत्ताधारी पक्षाचे आमदार बूट घालून महाराजांच्या पुतळ्यावर चढले होते तो अपमान नव्हता का? अशी विचारणा केली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कर्नाटकमध्ये वा कुठेही, महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. कर्नाटक सरकारनेही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहीत त्यांचं वक्तव्य कसं फिरवलं गेलं हे दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराज किंवा तिथले महनीय व्यक्ती यांच्या पुतळ्याबाबतही असं करणं निंदनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचं वक्तव्य फिरण्यात आलं होतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; बेळगावात मराठी भाषक रस्त्यावर

पुढे ते म्हणाले की, “ही घटना घडल्यानंतर सीएमओही मोठं निवेदन काढतं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेतही मग त्यावर बोलतात. सत्तापक्षाचे एक आमदार महाराजांच्या पुतळ्यावर बूट घालून चढतात. मग तो अपमान नाहीये महाराजांचा? महाराजांचा अपमान काय निवडक आहे का? याबाबत मात्र हे मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राऊतांचं काही वक्तव्य नाही. असा निवडक अपमान होऊ शकत नाही, आणि तुम्ही तो निवडूही शकत नाही. महाराजांचा अपमान कोणीही केला असला तरी आम्ही निषेध करुच”.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरण: शिवसेनेचे मोदी, भाजपावर टिकास्त्र; म्हणाले “भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन…”

शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना आहे. महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान अशी टीकाही यावेली त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis karnataka chhatrapati shivaji maharaj statue mahavikas aghadi sgy