कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत निवडक निषेध केला जात आहे अशी टीका केली. तसंच सत्ताधारी पक्षाचे आमदार बूट घालून महाराजांच्या पुतळ्यावर चढले होते याची आठवण करुन देत तेव्हा मूग गिळून गप्प का बसले होते अशी विचारणा केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“कर्नाटकमध्ये वा कुठेही, महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. कर्नाटक सरकारनेही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहीत त्यांचं वक्तव्य कसं फिरवलं गेलं हे दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराज किंवा तिथले महनीय व्यक्ती यांच्या पुतळ्याबाबतही असं करणं निंदनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचं वक्तव्य फिरण्यात आलं होतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
What Asaduddin Owaisi Said?
Asaduddin Owaisi : देवेंद्र फडणवीस यांच्या ‘व्होट जिहाद’च्या आरोपांना ओवैसीचं उत्तर, “तुम्ही अयोध्येत..”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; बेळगावात मराठी भाषक रस्त्यावर

पुढे ते म्हणाले की, “ही घटना घडल्यानंतर सीएमओही मोठं निवेदन काढतं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेतही मग त्यावर बोलतात. सत्तापक्षाचे एक आमदार महाराजांच्या पुतळ्यावर बूट घालून चढतात. मग तो अपमान नाहीये महाराजांचा? महाराजांचा अपमान काय निवडक आहे का? याबाबत मात्र हे मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राऊतांचं काही वक्तव्य नाही. असा निवडक अपमान होऊ शकत नाही, आणि तुम्ही तो निवडूही शकत नाही. महाराजांचा अपमान कोणीही केला असला तरी आम्ही निषेध करुच”.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरण: शिवसेनेचे मोदी, भाजपावर टिकास्त्र; म्हणाले “भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन…”

शिवसेना नेते आणि कार्यकर्ते यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी शिवभोजन योजना आहे. महाराजांच्या नावे योजना आणि त्यात भ्रष्टाचार, हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती मोठा अपमान अशी टीकाही यावेली त्यांनी केली.

अधिवेशन घेण्याची सरकारची मानसिकताच नाही

“संसदेचं, अनेक राज्यांचं अधिवेशन फार काळ चालू शकतं, पण महाराष्ट्रात अधिवेशन घेण्याची मानसिकताच या सरकारची नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही आणि भोगशाही चालू आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार राज्याच्या जनतेनं कधीही पाहिला नाही. स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार सरकारच्या काळात पाहायला मिळतायत, तेवढे कधीच पाहायला मिळाले नाहीत”, अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार राजू नवघरेंकडून गंभीर चूक; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाले…!

“विरोधकांची तोंडं बंद करण्यासाठीच..”

“विरोधकांनी बोलू नये, त्यांची तोंडं बंद करण्यासाठी एकेक वर्षासाठी आमदारांना निलंबित करणं राज्याच्या इतिहासात अक्षरश: काळिमा फासण्याचं काम सरकारच्या दबावाखाली होत आहे. ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची कारणं सांगून आमच्या आमदारांना निलंबित केलं आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्याचं एवढंच कारण आहे की आपल्या स्वत:च्या आमदारांवर सरकारला विश्वास नाही, सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे. म्हणून मुद्दाम आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारने केला आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले.