भाजपा आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञात इसम अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा अशा प्रकारची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले पाहिजे असे म्हटले आहे.

School girl molested by senior citizen by threatening to kill her
pune crime: शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ज्येष्ठाकडून अत्याचार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
bjp want ajit pawar to contest elections separately jayant patil claim
‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
The woman attacked for refusing to marry in thane
विवाह करण्यास नकार दिल्याने महिलेने केला गुप्तांगावर हल्ला; तरुण गंभीर जखमी

“आशिष शेलार सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात. सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणत आहेत. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी गंभीरपणे घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेकडून नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची टेहळणी करण्यात आल्याचे उघड झाले असून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही यांस दुजोरा दिला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ही अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेली आहे. या संदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा घेतील आणि या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय तपास संस्थांकडून माहिती मिळाल्यावर पोलिसांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर, आणि इतर काही संवेदनशील ठिकाणी  सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्राप्त माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील एक तरुण जुलै महिन्यात नागपुरात आला होता. त्याचा येथे मुक्काम होता. या दरम्यान त्याने शहरातील संवेदनशील ठिकाणांची टेहळणी केली. संबंधित तरुणाला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली.