राज्यातील विविध भरती परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व घोटळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील नोकरशाही भ्रष्ट होत असल्याची मला चिंता आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या बैठकीला संबोधित करत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“महाराष्ट्रामध्ये असं सरकार पाहायाल मिळत आहे ज्यामध्ये दुराचार, अत्याचार, व्याभीचार, बलात्कार याचे नवे विक्रम सरकार तयार करत आहे. एखादी टोळी एकत्र येऊन राज्य चालवत असल्याचे आज आपल्याला दिसत आहे. हे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे महाराष्ट्रातच्या इतिहासातील सगळ्यात पळपुटे, डरपोक, खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. या सरकारमध्ये खंडणीखोरीची स्पर्धा लागली आहे. यांच्या मंत्र्यांना, नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की आपलं सरकार राहणार की जाणार त्याआधी जेवढा भ्रष्टाचार करता येईल तितका करत आहेत. कुठल्याही जिल्ह्यामध्ये अवैध दारू, वाळू,सट्टा या सरकारी आशिर्वादाने आपल्याया पाहायला मिळत आहेत. यामध्ये आमदारांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक गुंतले आहेत. हिस्से वाटण्यावरुन यांच्यामध्ये भांडणे होत आहेत,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“नितीन गडकरी मोठे नेते पण…”; शिवसेना भाजपा एकत्र येण्याच्या सत्तार यांच्या वक्तव्यावर देवेंद फडणवीसांची प्रतिक्रिया

“महाराष्ट्रातील नोकरशाही भ्रष्ट होत असल्याची मला चिंता आहे. जे लोक पैसे देऊन पद घेतील ते लोक गुंतवणूक केली आहे म्हणून सामान्य माणसांना त्रास देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे. जनतेने या तिघांवर विश्वास दिला नसून तो भाजपावर दाखवला. आपण उभे केलेले ७० टक्के उमेदवार निवडून आले. जनतेने तुम्हाला घरी बसवले होते. त्याच्यासोबत विश्वासघात करुन तुम्ही सत्तेवर आलात. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर संकटे आल्यानंतरही मदत करण्यात आली नाही. केंद्र सरकारने दिलेले आठ हजार कोटी रुपयेसुद्धा हे सरकार वाटू शकले नाही,” असे फडणवीस म्हणाले.

“तरी मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना..”; नवीन विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा

“ज्या प्रकारचे परीक्षा घोटाळे बाहेर येत आहेत त्यातून युवा पिढी बरबाद करण्याचे काम सुरु आहे. खिशात पैसे नसले तरी आई बाप मुलांना क्लास लावून देतात. मुलांना स्पर्धे परिक्षेमध्ये यश मिळावं आणि रोजगाराला लागावे अशी अपेक्षा असते. तयारी करुन गेलेल्या मुलांना माहिती नसते की कुणीतरी मंत्रालयामध्ये बसलेल्या नालायकाने पैसे खाऊन परीक्षा मॅनेज केली आहे. पैसे दिलेले विद्यार्थी पास होणार आहे हे ज्यावेळ त्या विद्यार्थ्याला समजते त्याच्या मनावर आणि आयुष्यावर जो परिणाम होतो त्याची कल्पना करवत नाही. ज्याप्रकारे पेपरफुटीची प्रकरणे घडली आहेत त्यामध्ये सरकारचा थेट संबंध आहे. न्यासा सारख्या कंपनीला लाखो परीक्षा घेण्यास दिल्या त्यालाच सरकारच्या तंत्रज्ञान विभागाने अपात्र ठरवले होते. सगळ्या परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले. परीक्षांचे भाव ठरले असून त्यानुसार पेपर फुटत आहेत. जीए सॉफ्टवेअरला काळ्या यादीत टाकल्यानंतरही पैसे घेऊन तीन महिन्यानांनी पुन्हा पात्र केले आणि परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले.

“या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची फॅक्टरी आहे त्यातील हे एक उत्पादन आहे. या फॅक्टरी विरुद्ध लढाई करावीच लागेल. कारण भाजयुमोला सामान्य विद्यार्थ्याला न्याय द्यावाच लागेल. अशा विद्यार्थ्यांना आपण न्याय देऊ शकलो नाही तर आपल्याला काळ देखील माफ करणार नाही. तुमच्या प्रखर भूमीकेमुळेच सरकारला झुकावे लागले,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.