आजचा दिवस या देशातील सोशिक, दुर्बल, वंचिताना प्रेरणा देणारा आहे. कारण आज परमपूज्य विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. डॉ.बाबासाहेबांनी वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, प्रस्थापितांकडून होणारे त्यांचे शोषण थांबले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात तशी तजविज केली. पण आजही सत्तेचा माज असणारे प्रस्थापित आमचे हक्क आमच्यापर्यंत पोहचू देत नाहीत अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
“जेव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. “आमच्या मेंढपाळांवर हल्ले होतात. वंचित समूहावर अँट्रोसिटीच्या घटनाही वाढायला लागतात. आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला दाबले जाते. पण तरीही बाबासाहेबांचे स्मरण करून सगळ्या संकटावर मात करत आपल्याला आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना असेल,” असंही पडळकर महणाले.