भाजपाने दंगली घडवण्यासाठी एक विंग तयार केली आहे. त्यांच्याकडून या दंगली घडवल्या जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. माझं अमित शाह यांना सांगणं आहे २०२४ ला दंगल करणाऱ्यांना लटकवण्यापेक्षा आत्ताच लटकवा असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच मोदींच्या डिग्रीचा मुद्दा जरी समोर आलेला असला आणि त्यावरून चर्चा होत असली तरीही आम्ही अदाणींचा सोडलेला नाही. अदाणींचा मुद्दा मागे पडला आहे असं समजू नका असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

“दंगलखोर कोण आहे आणि दंगली देशात कोण घडवतं आहे सगळ्यांना माहित आहे. काल हुबळीला दंगल कुणी घडवली?हावडामध्ये दंगल कोण घडवतं आहे? महाराष्ट्रात दंगली कोण घडवतं आहे? भारतीय जनता पार्टीने एक नवीन विंग तयार केली आहे. या विंगच्या माध्यमातून दंगली घडवायच्या. २०२४ च्या निवडणुकीच्या आधी हा देश दंगलींमध्ये होरपळून टाकायचा आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं किंवा निवडणुका पुढे ढकलायच्या अशा प्रकारचं यांचं धोरण दिसतं आहे. “

बंगालचा हिंसाचार भाजपा पुरस्कृत

बंगालमध्ये जो हिंसाचार घडवला जातो आहे तो भाजपा स्पॉन्सर्ड आहे. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठीच हे केलं जातं आहे. काही जागा टार्गेट केल्या जात आहेत. रामनवमी हे हिंसाचाराचं कारण ठरू शकतं का? मात्र हे वारंवार केलं जातं आहे. तसंच अशा राज्यांमध्येच केलं जातं आहे जिथे निवडणूक आहे किंवा भाजपाचं सरकार त्या ठिकाणी नाही. महाराष्ट्रातलं जे शिंदे गट आणि भाजपाचं सरकार बसलं आहे ते अत्यंत कमकुवत, कमजोर सरकार आहे. त्यामुळेच या ठिकाणी दंगली घडवल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीत यांचा सुपडा साफ होणार आहे या भीतीने दंगली घडवल्या जात आहेत. कर्नाटकमध्येही हीच परिस्थिती आहे, तसंच पश्चिम बंगालमध्येही हेच केलं जातं आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला. जिथे जिथे भाजपाला भीती वाटते आहे तिथे दंगली घडवल्या आहेत.

अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी दंगेखोरांना लटकवावं ना. त्यासाठी ते २०२४ ची वाट कशाला पाहात आहेत? कर्नाटक, पश्चिम बंगाल या ठिकाणी कारवाई करायला त्यांनी कुणी अडवलं आहे? अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी कारवाई करायला पाहिजे. या दंगलींचा मुद्दा आम्ही संसदेतही उपस्थित करणार आहोत मात्र आम्ही अदाणींचा मुद्दा सोडणार नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.