Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या पक्षातील बंडखोरावर काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यभरात भाजपा नेत्यांनी अनेकठिकाणी बंडखोरी केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. या नेत्यांवर कारवाई न झाल्यास महायुतीमध्ये चुकीच संदेश जाईल, अशी भीती वाटत असताना आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. भाजपाने अनेक बंडखोरांची समजूत घालून अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला. बोरीवली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केलेल्या गोपाळ शेट्टींनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी समजूत घालण्यात आली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र अनेक मतदारसंघातील बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

हे वाचा >> Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

२९ ऑक्टोबर रोजी जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तोपर्यंत महायुतीमधील ५० नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यापैकी ३६ उमेदवार हे महायुतीचे होते. यातही भाजपाचे सर्वाधिक १९ उमेदवार आहेत, तर त्यापाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे १६ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा केवळ एकच बंडखोर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागच्या आठवड्यात दिल्ली येथे झालेल्या बैठकीत महायुतीमधील बंडखोरांची समजूत काढण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिली होती.

महायुतीकडून ३६ बंडखोर

भाजपा विरुद्ध शिवसेना, ९ मतदारसंघ – ऐरोली, अंधेरी पूर्व, पाचोरा, बेलापूर, फुलंब्री, कल्याण पूर्व, विक्रमगड, सोलापूर शहर

शिवसेना विरुद्ध भाजपा, १० मतदारसंघ – मेहकर, बुलढाणा, सावंतवाडी, जालना, पैठण, घनसावंगी, अलिबाग, कर्जत, मिरा-भाईंदर

राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना, ७ मतदारसंघ – पाथरी, बीड, वाई, अनुशक्तीनगर, देवळाली, दिंडोरी आणि खेड आळंदी

राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, ९ मतदारसंघ – अहेरी, अमळनेर, अमरावती, पाथरी, शहापूर, जुन्नर, उदगीर, कळवण, आळंदी

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, १ मतदारसंघ – नांदगाव (नाशिक)