लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचं पानिपत झालं आहे. मागच्या वेळी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाची यावेळची संख्या ९ वर आली आहे. तर महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता अजित पवारांना पक्षात का घेतलं? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा सुरु झाल्या आहेत त्या ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रात आलेल्या लेखामुळे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना बळीचा बकरा केला जातं आहे असं म्हटलं आहे. भाजपावर त्यांनी आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“भाजपाकडून अजित पवारांचा बळीचा बकरा केला जातो आहे. उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली याला काय अजित पवार जबाबदार आहेत? याचं उत्तर भाजपाने द्यायला पाहिजे. भाजपाची मतं कमी झाली आहेत. छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर टीव्हीवर, चॅनल्सवरुन बोलणारे लोक कुठे गेले? हे लोक ऑर्गनायझरवर का बोलत नाहीत? इकडून तिकडे उड्या मारणारे लोक काय बोलणार?” असं म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीका केली. द ऑर्गनायझर मध्ये अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं होतं. भाजपाने अजित पवारांना बरोबर घ्यायला नको होतं या आशयाचा लेख लिहिण्यात आला होता. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “विठ्ठलाच्या नावाने दरोडा”, महाआरोग्य शिबीराचा खर्च मांडत जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप

छगन भुजबळ यांची गळचेपी

“गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षात छगन भुजबळ यांची गळचेपी सुरु आहे. मनुस्मृतीबाबत त्यांनी भूमिका घेती होती. छगन भुजबळ यांनी कायमच मला मदत केली आहे. त्यांची त्या पक्षात घुसमट होते आहे हे नक्की आहे” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. तसंच ते पक्ष सोडतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. याबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “…म्हणून देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले”, आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला श्रेय

अमोल कीर्तिकर यांच्या पराभवाबाबत काय म्हणाले आव्हाड?

“अमोल कीर्तिकर विजयी झाले आहेत हे मी आधीपासून सांगितलं होतं. ज्यावेळी वायकर यांना कमी मतं मिळाली त्यावेळीच वायकरांच्या नातेवाईकांकडे मोबाइल कसा आला? सूर्यवंशी नावाच्या ज्या महिला तिथे आर. ओ म्हणून काम करत होत्या त्यांचे कुणाशी संबंध आहेत हे मला माहीत आहे. कारण त्या ठाण्यात होता. त्यांच्यामुळे सगळ्यांना समजलं की ईव्हीएममधून मोबाइलवर ओटीपी येतो.” असंही आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is targeting ajit pawar for the sabha election loss said jitendra awhad scj