राज्यासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपा तसेच महाविकास आघाडीचे बडे नेते छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच स्वपक्षातील आमदारांनाही मुंबईत येण्याचे आदेश भाजपा आणि महाविकास आघाडीने आदेश दिले आहेत. घोडेबाजार टाळता यावा म्हणून भाजपाने त्यांच्या आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवले आहे. तर महाविकास आघाडीच्या आमदारांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेल ट्रायडेन्टमध्ये करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> प्रेषित अवमान प्रकरण: “मोदींनी हे समजून घेण्याची गरज आहे की…”; भाजपाला लक्ष्य करत ओवेसींकडून नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या दहा जून रोजी मतदान होणार आहे. सहाव्या जागेवर विजय हवा असेल तर यावेळी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांची आवश्यकता भाजपा आणि महाविकास आघाडीला भासत आहे. त्यामुळे आता या आमदारांचे मन वळण्यासाठी सर्वच पक्षांकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. तसेच आपापल्या पक्षाच्या आमदारांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवले जात जात आहे.

हेही वाचा >> पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीचे ‘मिशन विदर्भ,’ सुप्रिया सुळेंनी स्वीकारले नेतृत्व; काँग्रेस, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न?

भाजपाचे आमदार ताज तर मआविचे ट्रायडंटमध्ये

निवडणूक जवळ आल्यामुळे घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईत पाचारण केलं आहे. भाजपाने आपल्या आमदारांची सोय हॉटेल ताजमध्ये तर महाविकास आघाडीने आपल्या आमदारांची राहण्याची व्यवस्था हॉटेल ट्रायडंटमध्ये केली आहे. येथे पक्षांकडून आमदरांना मतदानाची प्रक्रिया सांगितली जाऊ शकते. तसेच महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार निवडून येणार का? जयंत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, या निवडणुकीत आमचेच उमेदवार निवडून येणार असा विश्वास भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. महाविकास आघाडीला त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय. आमच्याकडे कुठेही धावपळ नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आमदारांशी संपर्क करतोय. आम्हाला मतदान करा अशी विनंती आम्ही त्यांना करतोय, असे भाजपाकडून म्हटले जात आहे. तर कोणत्याही परिस्थितीत आमचेच उमेदवार निवडून येणार. आम्ही अपक्ष आमदारांशी संपर्क साधत आहोत, प्रक्रिया सुरु आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp keeps mla in taj hotel congress ncp shiv sena mla kept in hotel trident amid rajya sabha election 2022 prd