Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २७ मे रोजी छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता. विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PHOTOS: ईडीने अनिल परबांशी संबंधित जागांवर छापेमारी केलेली ‘ती’ सात ठिकाणं कोणती?

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत विभास साठे यांच्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचं सांगत सोबत पत्र शेअर केलं आहे.

सांडपाण्याबाबतच्या तक्रारीवरून छापे; ईडी कारवाईप्रकरणी अनिल परब यांचा दावा

“अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे ‘मनसुख हिरेन’ होऊ नये,” असं किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पत्रात काय म्हटलं आहे –

किरीट सोमय्यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा, संस्थांनी तसंच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परब यांनी २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फसवणूक करत रिसॉर्ट बांधला,” असं सोमय्यांनी पत्रात सांगितलं आहे.

पुढे ते म्हणतात की, “अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये हे पाहणे महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी आहे. विभास साठे यांच्या जीवाला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये हे पहावे ही विनंती”.

सांडपाण्याबाबतच्या तक्रारीवरून छापे; ईडी कारवाईप्रकरणी अनिल परब यांचा दावा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली. मुळात त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही आणि अद्याप काम पूर्ण होऊन ते रिसॉर्ट सुरूही झालेले नाही. बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल व त्यागोष्टीचा पैशांच्या गैरव्यवहाराशी काय संबंध, असा सवाल करत शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी ईडीच्या कारवाईला हास्यस्पद ठरवलं होतं. पण कोणत्याही चौकशीला कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

केंद्रीय यंत्रणा ‘मातोश्री’ च्या दारात; अनिल परब यांच्या मालमत्तांवर ‘ईडी’ चे छापे; पुढील कारवाई कुणावर?

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर गुरुवारी छापे टाकल़े. ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या ११ सदनिकांवर जप्तीच्या कारवाईपाठोपाठ यशवंत जाधव यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेले असताना परब यांच्यावरील या कारवाईमुळे तपास यंत्रणा ‘मातोश्री’च्या दारापर्यंत पोहोचल्याचे मानले जात़े

कारवाईच्या फेऱ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचे नेते

अनिल देशमुख – अटक
नवाब मलिक – अटक
उपमुख्यमंत्री अजित पवार – बहिणींच्या निवासस्थानांवर छापे
ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ – चौकशी सुरू
संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी
खासदार भावना गवळी – चौकशीसाठी पाचारण
यशवंत जाधव – चौकशीला हजर राहण्याची नोटीस
मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर – सदनिकांवर जप्ती
आनंद अडसूळ – बँक घोटाळाप्रकरणी आरोप
अनिल परब : ईडीकडून चौकशी आणि मालमत्तांवर छापे