शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वाकचौरे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांना पराभूत केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१४ च्या निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, २०१४ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वाकचौरे भाजपात गेले आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र तिथेही त्यांना अपयश आले. यानंतर आता ते पुन्हा ठाकरे गटात परतणार आहेत. उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहेत.

हेही वाचा- “आम्ही आमचाच टेंभा मिरवतोय, असं…”, शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, “आज मी स्वगृही परतत आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं होतं. २०१४ ला जे घडलं किंवा घडवलं गेलं, त्याची मी पुन्हा चर्चा करू इच्छित नाही. परंतु एकच सांगू इच्छितो की, ‘सुबह का भुला शाम को घर आ जायें, तो उसे भुला नहीं कहते’, या उक्तीप्रमाणे मी स्वगृही परतत आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मी शिवबंधन बांधून घेत आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader and shivsena former mp bhausaheb wakchaure will join uddhav thackeray faction rmm
Show comments