मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधानं केली आहेत. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावरदेखील टीका केली जात होती. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा