Ashish Shelar On Saif Ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याची घटना आज (१६ जानेवारी) घडली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला आहे. सध्या सैफ अली खानवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफ अली खान मुंबईतील त्याच्या घरी असताना अचानक घरात एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. यानंतर तातडीने सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या सैफ अली खानवर उपचार सुरु आहेत. तसेच सैफ अली खानची एक सर्जरी झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, या घटनेबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. आज भाजपाचे नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेतली. त्यानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधत सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती दिली. तसेच ही हल्ल्याची घटना अतिशय गंभीर आणि भितीदायक असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची १० पथके रवाना करण्यात आलेली आहेत, अशी माहितीही आशिष शेलार यांनी सांगितली.

आशिष शेलार काय म्हणाले?

“सैफ अली खान हे आयसीयूमध्ये असून ते सध्या आराम करत आहेत. सैफ अली खान यांची पाच तासांची एक मोठी सर्जरी झाली आहे. त्यांच्या शरीरावर सहा ठिकाणी जखमा असल्याची माहिती मला हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली. तसेच सर्जरी झाल्यामुळे सैफ अली खान यांना विश्रांतीची आवश्यकता असून त्यांच्यावर योग्य त्या प्रकारचे उपचार सुरु आहेत. सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ही घटना अतिशय गंभीर आणि भितीदायक अशी घटना आहे”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. तसेच आरोपीला पडकडण्यासाठी आवश्यक ते पावलं पोलिसांनी उचलले आहेत. या घटनेतील फुटेज असतील किंवा काही फोटो असतील याचा तपास सुरु आहे. तसेच आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची १० पथकं रवाना करण्यात आलेले आहेत. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. आपण अपेक्षा करूया की आरोपी लवकरच पकडला जाईल”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

‘कोण काय बोललं? यावर प्रतिक्रिया देणार नाही’

सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर कोण काय बोललं? कोणी काय ट्वीट केलं? यावर प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करण्यापेक्षा आरोपी पकडला जाणं महत्वाचं आहे, तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई आवश्यक आहे. त्यामुळे कोणी काय ट्वीट केलं आणि कोण काय बोललं? यावर मी भाष्य करणार नाही”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.