ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजपा हाच पक्ष नंबर वन ठरला आहे. तसंच या निवडणूक निकालांमध्ये महायुतीची सरशी झाली आहे. त्यानंतर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना मराठी माणसाने झिडकारल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी?

“उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने झिडकारलं आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी केलेली प्रतारणा महाराष्ट्राला मान्य नाही. उद्धव ठाकरेंनी बदलेले विचार आणि मतांसाठी सुरु केलेलं लांगुलचालन याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने लाथ मारली आहे. उद्धव ठाकरेंनी केलेली काँग्रेसशी युती , राम मंदिर, रामजन्मभूमी, त्यासाठीची वर्गणी याची केलेली चेष्टा हे मराठी माणसाला न आवडल्याचं या निकालांमधून स्पष्ट दिसतं आहे.” असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

नाना पटोलेंवर टीका

नाना पटोलेंना खुमखुमी असेल तर माझं थेट आव्हान आहे. त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि तिथे पोटनिवडणूक घेऊन दाखवावी. नाना पटोलेंना भाजपा आणि महायुती त्यांना चारी मुंड्या चीत करुन दाखवेल. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी मराठीत म्हण आहे तशीच आत्ता नाना पटोलेंची अवस्था आहे. असंही शेलार म्हणाले.

नाना पटोलेंचा दावा आहे की त्यांचा पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर वन आहे. अहो त्यांच्या नावातच नाना आहे. नावात नकारघंटा असलेला माणूस सत्य कसं बोलणार? शेवटून पहिला किंवा दुसरा नंबर आला आहे ते जर त्यांना सर्वाधिक वाटत असेल तर ते बरोबरच असेल. भाजपाच्या जितक्या जागा निवडून आल्या तेवढ्या जागांची एकूण संख्याही महाविकास आघाडीची झालेली नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार विकास करतं आहे. या सरकारला जनतेने हा कौल दिला आहे असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

Story img Loader