ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सातत्याने भाजपावर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा भाजपा नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे. “तुम्ही तुमचं नाव सुषमा अंधारेंऐवजी सुषमा आगलावे करा” असा खोचक सल्ला शेलार यांनी अंधारेंना दिला आहे. “स्वत:च्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा बरा नव्हे. तुमच्याकडून ही अपेक्षा नाही”, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“डोळ्याला पाणी लाऊन म म म्हणणारे हिंदुत्व….”, सुषमा अंधारेंनी ठणकावून सांगितलं; फडणवीस, केसरकरांना ही केलं लक्ष

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

“राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य तुम्हाला करावी लागत आहेत. मात्र, अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांचे हाल काही काळानंतर काय होतात, हे मनिषा कायंदेंना विचारा”, असंही शेलार अंधारेंना उद्देशून म्हणाले आहेत. “आम्ही आगलावे असू तर हवेत गोळीबार करणारे सदा सरवणकर कोण आहेत? जे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात, जे संजय गायकवाड ‘चून चून के मारेंगे’ म्हणतात, आम्ही हिशोब चुकता करू, अशी जाहीर गुंडांची भाषा तानाजी सावंत करतात, या सर्वांना काय उपाधी द्याल?”, असा प्रतिप्रश्न अंधारेंनी शेलार यांना केला आहे. गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार निव्वळ मवाल्यांसारखी भाषा करतात, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

“तुमची लेकरं उघडी-पाघडी रस्त्यावर फिरतायत आणि तुम्ही…”, सुषमा अंधारेंचा भाजपाला खोचक टोला!

शुद्धीकरणाचा अशुद्ध विचार मनात का आला?- शेलार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आमदारांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी त्याठिकाणी गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. यावरुनही शेलार यांनी ठाकरे गटाला सवाल विचारला आहे. “शुद्धीकरणाचा अशुद्ध विचार आपल्या मनात का रुजला हा आमचा प्रश्न आहे”, असं शेलार म्हणाले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट, ठाकरे गटाकडून स्मारकाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करायला जाताना खंजीर बाजूला ठेवून जा, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला होता. “बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे आम्ही शस्त्र-अस्त्र घेऊन जात नसतो. त्यांच्याकडून विचारांचं शस्त्र घेत असतो”, असं प्रत्त्युत्तर शेलार यांनी राऊतांना दिलं आहे.