राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपा नेते चंद्रकात पाटील यांनी टोलेबाजी केली आहे. “महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले याचं कारण की ते देश फिरले, सर्वसामान्य माणसांचं मन समजून घेतलं, हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना उशिरा कळलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र, आता त्यांना साक्षात्कार झाला आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
“छोटा पप्पू आत्ता जे बोलतोय, ते…”, आदित्य ठाकरेंना अब्दुल सत्तारांचा खोचक टोला!
प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर मागण्या करताना आपण सत्तेत असताना या गोष्टी केल्या नाहीत, याची आठवण ठेवावी, असा सल्लाही पाटलांनी ठाकरे पिता-पुत्रांना दिला आहे. आदित्य ठाकरेंनी नुकताच नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला आहे. प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू, असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले आहे.
“गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
‘कटुता संपवाच’, ठाकरे गटाकडून फडणवीसांना आवाहन; म्हणाले “विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा…”
दरम्यान, राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. नुकसानग्रस्त तालुक्यांमध्ये ओला दुष्काळाच्या उपाययोजना ताबडतोब सुरू केल्या पाहिजेत, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.