आज सकाळी नऊ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी देखील वेगवान राजकीय घडमोडी घडत आहेत.

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या दिवशीच बावनकुळे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Vinayak Raut On Shinde Group Ajit Pawar Group
Vinayak Raut : “शिंदे गट आणि अजित पवार गटाला लवकरच…”, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
Sharad Pawar Thackeray group former corporators keen to return home Discussion with Deputy Chief Minister Ajit Pawar Pune news
पिंपरी : शरद पवार, ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा
guardianship of Akola district is with Adakash Fundkar print politics news
अकोल्याला सलग चौथ्यांदा बाहेरची पालकमंत्री; समन्वय राखून प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान

अजित पवारांची भेट घेतल्यानंतर याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता, त्यांनी स्मितहास्य करत अजित दादांकडे नागपुरचं एक काम होतं, असं म्हटलं आहे. मतदानाच्या दिवशी नागपुरचं काम कसं काय काढलं? असा सवाल विचारला असता. ते म्हणाले, “आजचं मतदान झालं. १ लाख टक्के भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहे. पाचवा उमेदवार हा इतर दहा उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मतांनी निवडून येईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेचा विजय हा राज्यसभेपेक्षा मोठा विजय असणार आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- विधान परिषद निवडणूक: “शिवसेनेचा एक उमेदवार १०० टक्के पडणार”, रवी राणा यांचा खळबळजनक दावा

दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची देखील गळाभेट घेतली आहे. बावनकुळे यांनी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आजच्या निवडणुकीत कोणाचा उमेदवार पराभूत होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Story img Loader