केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबाद शहराचं नाव अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या नामकरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्याविरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण सुरू असताना आंदोलनस्थळी काही जणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्वरीत ते पोस्टर हटवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंदोलनस्थळी घडलेल्या या प्रकारानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचे तुष्टीकरण करण्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही काही बोलणार आहात की मूग गिळून गप्प बसणार आहात? असा खोचक सवाल बावनकुळेंनी विचारला आहे. त्यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे.

हेही वाचा- ५०० कोटींचा घोटाळा: उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय तुरुंगात जाणार? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

चंद्रशेखर बावनकुळे ट्विटमध्ये म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकलेत. शिवरायांच्या पावन भूमीत औरंग्याचं समर्थन कशासाठी? औरंग्याचं तुष्टीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा बीमोड करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे, तुम्ही औरंग्याच्या तुष्टीकरणावर काही बोलणार आहात की मूग गिळून गप्प बसणार आहेत? असा सवाल बावनकुळेंनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule on uddhav thackeray aurangazeb photos mim protest chhatrapati sambhajinagar rmm